नवी दिल्ली 19 एप्रिल : तुमचंही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयमध्ये (State Bank Of India) खातं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बँकेनं देशातील 44 कोटी ग्राहकांना इशारा दिला आहे. SBI च्या वेबसाईटनुसार, देशभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशात सर्वांनी सावध राहाणं गरजेचं आहे. यासोबतच तुम्ही कधीही आपल्या खात्याची माहिती आपल्या मोबाईलमध्ये सेव करुन नाही ठेवली पाहिजे. जर तुम्ही आपला OTP, पिन नंबर, डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा CVV किंवा एटीएम डिटेल्स सेव करुन ठेवल्या असतील तर ते लगेचच डिलिट करा, अन्यथा तुमचं खातं खाली होऊ शकतं.
SBI नं म्हटलं आहे, की ग्राहकांनी ही चूक अजिबात करू नये, ज्यामुळे बँक अकाऊंट रिकामं होईल. बँकेनं माहिती देताना सांगितलं, की कधीही आपले बँक अकाऊंट किंवा ऑनलाईन बँकिंग डिटेल्स फोनमध्ये सेव्ह ठेवू नका.
ज्येष्ठ नागरिकांना मिळेल खूशखबर! NPS बाबत सरकार घेऊ शकतं मोठा निर्णय
बँकेनं म्हटलं आहे, की बँक अकाऊंट नंबर, पासवर्ड, एटीएम कार्डचा नंबर किंवा याचा फोटो काढून ठेवल्यामुळेदेखील तुमची माहिती लिक होण्याची शक्यता आहे. यामुळे तुमचं अकाऊंटदेखील पूर्णपणे रिकामं होऊ शकतं. याशिवाय ग्राहकांनी एटीएम कार्डदेखील इतरांसोबत शेअर करणं टाळायला हवं. यामुळे तुमच्या कार्डची माहिती सहज लिक होऊ शकते आणि तुमची कोणीही सहजरित्या फसवणुक करू शकतं.
स्टेट बँकच्या म्हणण्यानुसार, देशातील सगळ्या ग्राहकांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की पब्लिक इंटरनेटचा वापर पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी करू नये. यामध्ये तुमची खासगी माहिती लिक होण्याची भीती अधिक असते.
बँक कधीही तुम्हाला फोन किंवा एसएमएसच्या माध्यमातून यूजर आयडी, पिन, पासवर्ड, सीवीवी, ओटीपी, यूपीआय यासारखी संवेदनशील माहिती मागत नाही. त्यामुळे, अशा गोष्टींची विचारणा करणारा फोन तुम्हाला आल्यास सावधान राहा आणि कोणतीही माहिती सांगू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank details, Credit cars number, Financial fraud, Password, SBI, SBI Bank News