मराठी बातम्या /बातम्या /मनी /ज्येष्ठ नागरिकांना मिळेल खूशखबर! म्हातारपणाची राहणार नाही चिंता, सरकार घेऊ शकतं असा निर्णय

ज्येष्ठ नागरिकांना मिळेल खूशखबर! म्हातारपणाची राहणार नाही चिंता, सरकार घेऊ शकतं असा निर्णय

ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) पेन्शन योजनेबाबत (Pension Scheme) लवकरच एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. वयोवृद्ध नागरिकांसाठी सरकार एक विशेष योजना आखत असून, लवकरच त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) पेन्शन योजनेबाबत (Pension Scheme) लवकरच एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. वयोवृद्ध नागरिकांसाठी सरकार एक विशेष योजना आखत असून, लवकरच त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) पेन्शन योजनेबाबत (Pension Scheme) लवकरच एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. वयोवृद्ध नागरिकांसाठी सरकार एक विशेष योजना आखत असून, लवकरच त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली, 18 एप्रिल: ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) पेन्शन योजनेबाबत (Pension Scheme) लवकरच एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. वयोवृद्ध नागरिकांसाठी सरकार एक विशेष योजना आखत असून, लवकरच त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. सरकारच्या या योजनेमुळे वयाच्या 70व्या वर्षी देखील नागरिक नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस) अंतर्गत खाते उघडू शकणार आहेत. त्यामुळे अनेक वृद्ध नागरिकांना वयाच्या 70 व्या वर्षांनंतर देखील पैशाची काळजी करावी लागणार नाही. सेवानिवृत्तीनंतरची तरतूद करण्यासाठी गुंतवणूकदार चांगला परतावा देणाऱ्या योजनांच्या शोधात असतात. त्यांच्यासाठी एनपीएस (NPS) उत्तम पर्याय ठरत आहे.

    काय आहे ही योजना?

    पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणानं (PFRDA) सरकारकडे एक प्रस्ताव पाठवला असून, त्यात नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात एनपीएस अंतर्गत खाते उघडण्यासाठी कमाल वयोमर्यादा सध्याच्या 65 वर्षांवरून 70 वर्षे करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीनं वयाच्या 60व्या वर्षानंतर एनपीएस योजनेत गुंतवणूक केली तर त्याला वयाच्या 75व्या वर्षापर्यंत खाते चालविण्याची आणि परतावा मिळवण्याची परवानगी देण्यात यावी असंही प्राधिकरणानं सुचवलं आहे.

    (हे वाचा-पंजाबमध्ये MSP ची रक्कम थेट बँक खात्यात जमा, नव्या प्रणालीबाबत शेतकरी समाधानी)

    वाचा काय आहेत अधिकार?

    याबाबत माहिती देताना प्राधिकरणाचे अध्यक्ष सुप्रिम बंधोपाध्याय म्हणाले की, गेल्या साडे तीन वर्षात 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 15 हजार लोकांनी एनपीएस खातं उघडलं आहे. ते पाहता या योजनेत सहभागी होण्याची वयोमर्यादा किमान 5 वर्षांनी वाढवावी असा प्रस्ताव देण्यात आला आहे.

    राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना जानेवारी 2004 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. 2009 मध्ये ही सर्वासाठीच खुली करण्यात आली. एनपीएसमध्ये वयाच्या 30 व्या वर्षापासून खाते उघडून , 30 वर्षे दरमहा 3 हजार रुपये गुंतवणूक केल्यास एकूण रकमेपैकी 40 टक्के म्हणजे 41 लाख 2 हजार 786 रुपयांची रक्कम जमा होते. या रकमेतून अॅन्युईटी खरेदी केल्यास साधारण सहा टक्के दरानं दरमहा 13 हजार 676 रुपयांची पेन्शन (Pension) मिळू शकेल. दररोज 100 रुपयांची बचत केल्यास हे उद्दिष्ट साध्य करता येईल.

    (हे वाचा-कोरोना काळात नोकरीची चिंता? 50 हजारात हा व्यवसाय सुरू करून मिळवा लाखोंचा नफा)

    एनपीएसमध्ये पेन्शनचं वय किती आहे?

    सध्या एनपीएसमध्ये वयाच्या 60 व्या वर्षांपर्यंत खातं उघडता येतं. यामध्ये जमा केलेल्या रकमेच्या आधारे पेन्शन निश्चित केलं जातं. किती पेन्शन मिळणार हे दरमहा जमा केलेल्या रकमेवर अवलंबून असतं. अटल पेन्शन योजनेमध्ये एक हजार ते 5 हजार रुपयांच्या दरम्यान पेन्शन निश्चित केली जाते.

    First published:

    Tags: Pension, Pension funds