मराठी बातम्या /बातम्या /मनी /या Multibagger Stock ने दिला 22000 टक्के परतावा, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

या Multibagger Stock ने दिला 22000 टक्के परतावा, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

गेल्या 20 वर्षांत 22 हजार टक्के रिटर्न देणारा हा मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) तुमच्याकडे आहे का?

गेल्या 20 वर्षांत 22 हजार टक्के रिटर्न देणारा हा मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) तुमच्याकडे आहे का?

गेल्या 20 वर्षांत 22 हजार टक्के रिटर्न देणारा हा मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) तुमच्याकडे आहे का?

    मुंबई, 16 ऑक्टोबर: गेल्या 20 वर्षांत 22 हजार टक्के रिटर्न देणारा हा मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) तुमच्याकडे आहे का? शेअर बाजारात (Investment Share Market) गुंतवणूक करणं आणि प्रचंड नफा कमावणं हे अनेकांचं स्वप्न असतं. तसं बघायला गेलं तर शेअर विकत घ्यायचे काही दिवस ठेवायचे आणि नंतर विकून नफा कमवायचा इतकं साधं, सोपं सूत्र आहे असं वाटतं. पण कुठला शेअर निवडायचा आणि तो किती काळ ठेवायचा हे कळायला अभ्यास लागतो. भारतीय शेअर मार्केटमधील सुप्रसिद्ध गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala Networth) यांनी गुंतवणुकदारांना नेहमी सांगितलंय की कुठल्याही स्टॉकमध्ये त्याचा PE सर्वोच्च बिंदूला जाईपर्यंत त्यात गुंतवणूक ठेवा. पण तुम्हाला त्या स्टॉकचा PE समजण्यासाठी कंपनीच्या बिझनेस मॉडेलचा अभ्यास करणं गरजेचं असतं.

    जर कोणाही गुंतवणूकदारानं ही साधी सूत्र लक्षात ठेवली आणि हजारो रुपयांची दीर्घकालीन गुंतवणूक केली तर तो नक्की कोट्याधीश बनू शकतो. याबाबत मॅरिको (Marico Share Price) शेअर्सचं उदाहरण आपण बघूया. 19 ऑक्टोबर 2001 रोजी एनएसईवर (NSE) मॅरिकोच्या शेअरची किंमत 2 रुपये 66 पैसे प्रतिशेअर होती. आज त्याच मॅरिकोच्या शेअरची किंमत 588 रूपये आहे. याचाच अर्थ 20 वर्षांच्या कालावधीत सुमारे 220 वेळा या शेअरची कामगिरी कौतुकास्पद ठरली.

    वाचा-Adani Group च्या या कंपनीचा IPO येणार, SEBI ने दिली मंजुरी; कमाईची सुवर्णसंधी!

    गेल्या एका आठवड्यात मॅरिकोचे शेअर 563.30 रूपयांवरून 588 रुपयांवर पोहोचले. या कालावधीत शेअरच्या दरात सुमारे 4.50 टक्क्यांनी वाढ झाल्याचं या मल्टीबॅगर स्टॉकच्या शेअर किमतीच्या इतिहासानुसार दिसून येतं. त्याचप्रमाणे मल्टीबॅगर स्टॉक एका महिन्यात 5.5 टक्क्यांनी वधारला असून तो 558.30 रुपयांवरून 588 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे गेल्या 6 महिन्यात मॅरिकोच्या शेअरच्या किमतीत 40 टक्क्यांनी वाढ झाली असून हे दर 423.30 वरून 588 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. एका वर्षाच्या कालावधीत या शेअरच्या किमतीत सुमारे 65 टक्क्यांनी वाढ झाली. या कालावधीत मॅरिकोचे शेअर 423.30 रुपयांवरून 588 रुपयांपर्यंत पोहोचले. गेल्या 5 वर्षात या मल्टीबॅगरनं 115 टक्के परतावा दिला आहे. अर्थात त्यांचा स्टॉक 275.70 वरून 588 वर पोहोचल्यानं हे शक्य झालं आहे. हा स्टॉक 2.66 रुपये प्रतिशेअर पातळीवरून वाढत 588 रुपये प्रतिशेअर झाला आहे, त्यामुळे गेल्या 20 वर्षांत या मल्टीबॅगरनं सुमारे 22,000 टक्के परतावा दिला आहे.

    लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, मॅरिकोच्या शेअरविषयी बोलताना एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक मुदित गोयल म्हणाले की, मॅरिकोच्या शेअरची किंमत अल्पावधीत 602 रुपयांपर्यंत जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीने अगदी सध्याच्या 575 रुपये दरानं शॉर्ट टर्मसाठी (Short term) या शेअरमध्ये गुंतवणूक केली तरी त्याला फार तोटा सहन करावा लागणार नाही.

    वाचा-IT शेअर्समधून होईल बक्कळ कमाई; फक्त या बाबींवर ठेवा लक्ष

    मॅरिकोच्या शेअरच्या इतिहासावर एक नजर टाकता असं दिसून येतं की जर एखाद्या गुंतवणूकदारानं एक आठवड्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्या 1 लाखाचे आज 1.045 लाख झाले असते. जर गुंतवणूकदारानं 6 महिन्यापूर्वी या मल्टी बॅगर स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते. त्या 1 लाखाचे आज 1.40 लाख झाले असते. त्याचप्रमाणे जर गुंतवणूकदारानं 1 वर्षापूर्वी या मल्टी बॅगर स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते तर आज त्याला 1.65 लाख रुपये मिळाले असते. गुंतवणूकदारानं 5 वर्षापूर्वी 1 लाख गुंतवले असते तर त्याला आज 2.15 लाखांचा परतावा मिळाला असता. 20 वर्षापूर्वी जेव्हा या शेअरची किंमत 2.66 रुपये होती, त्यावेळी कोणी 1 लाख गुंतवले असते आणि हा शेअर होल्ड केला असता तर आज त्याचे 2.20 कोटी रुपये झाले असते.

    या मल्टीबॅगर स्टॉकची ही सर्व पार्श्वभूमी बघता शेअर बाजारातील तज्ज्ञांना यात अजूनही नफा दिसतो. शॉर्टटर्ममध्ये याची प्रतिशेअर पातळी 602 रुपयांपर्यंत तत्काळ जाऊ शकते, असे मत हे तज्ज्ञ व्यक्त करतात.

    (डिस्क्लेमर: बाजारातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कुणालाही https://lokmat.news18.com/ वरून पैसे गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात नाही.)

    First published:

    Tags: Share market