मराठी बातम्या /बातम्या /मनी /IT शेअर्समधून होईल बक्कळ कमाई; फक्त या बाबींवर ठेवा लक्ष

IT शेअर्समधून होईल बक्कळ कमाई; फक्त या बाबींवर ठेवा लक्ष

सध्या शेअर मार्केटमध्ये (Share Market) काहीसं सकारात्मक चित्र आहे. त्यामुळे अधिकाधिक रिटर्न्ससाठी (Returns) नेमकी कशामध्ये गुंतवणूक (Investment) करावी, असा प्रश्न सातत्यानं गुंतवणूकदारांना सतावत आहे.

सध्या शेअर मार्केटमध्ये (Share Market) काहीसं सकारात्मक चित्र आहे. त्यामुळे अधिकाधिक रिटर्न्ससाठी (Returns) नेमकी कशामध्ये गुंतवणूक (Investment) करावी, असा प्रश्न सातत्यानं गुंतवणूकदारांना सतावत आहे.

सध्या शेअर मार्केटमध्ये (Share Market) काहीसं सकारात्मक चित्र आहे. त्यामुळे अधिकाधिक रिटर्न्ससाठी (Returns) नेमकी कशामध्ये गुंतवणूक (Investment) करावी, असा प्रश्न सातत्यानं गुंतवणूकदारांना सतावत आहे.

     मुंबई,16ऑक्टोबर-  सध्या शेअर मार्केटमध्ये (Share Market) काहीसं सकारात्मक चित्र आहे. त्यामुळे अधिकाधिक रिटर्न्ससाठी (Returns) नेमकी कशामध्ये गुंतवणूक (Investment) करावी, असा प्रश्न सातत्यानं गुंतवणूकदारांना सतावत आहे. कोरोना काळ, महागाई आदी घटक पाहता, केलेल्या गुंतवणूकीतून चांगले रिटर्न्स मिळावेत अशीच अपेक्षा गुंतवणूकदारांची आहे. गेल्या काही दिवसांपासून निर्बंध हटवल्यानं सर्व व्यवहार सुरळीत झाले असून, त्याचे सकारात्मक परिणाम येत्या काळात मार्केटवर दिसून येतील, असं तज्ज्ञांचं मत आहे. या पार्श्वभूमीवर, आयटी क्षेत्रात (IT Sector) सध्या चांगली तेजी दिसत असून, या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदारांनी प्राधान्य द्यावं, या क्षेत्रात गुंतवणूक केल्यास आगामी काळात गुंतवणूकदारांना निश्चित फायदा होईल, असा सल्ला हेम सिक्युरिटीजचे मोहीत निगम यांनी `मनी कंट्रोल`शी बोलताना दिला.

    निगम यांनी सांगितलं की, ``अर्थिक वर्ष 2022 मध्ये मिडकॅप (Mid cap) आयटी कंपन्यांचं उत्पन्न 20 ते 25 टक्क्यांनी वाढू शकतं. तसंच लार्जकॅप (Large cap) आयटी कंपन्यांचं उत्पन्न 15 ते 20 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. कोरोनाचा संकटाचा सर्वाधिक फटका एव्हिएशन, हॉटेल आणि पर्यटनासारख्या क्षेत्राला बसला आहे. मात्र आता सणासुदीच्या काळात या क्षेत्रात मागणी वाढल्यास हे क्षेत्र पुन्हा तेजीत येऊ शकते. आता परत कोरोनाची लाट येऊ नये, अशी अट मात्र त्यासाठी असेल``.

    (हे वाचा:5 रुपयांचा हा शेअर पोहोचला ₹233 वर, 1 लाखाचे कमावले 42.30 लाख)

    आयटी क्षेत्राविषयी बोलताना निगम म्हणाले की, ``टीसीएस (TCS) वगळता अन्य सर्व आयटी कंपन्यांचे रिझल्ट अपेक्षेपेक्षा चांगले आहेत. या कंपन्यांनी त्यांचा ग्रोथ गाईडन्सही वाढवला आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत आयटी कंपन्यांना मोठे डिल (Deal) मिळाले आहेत. त्याचप्रमाणे आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेली नोकरभरती पाहता, या कंपन्यांकडे वाढती मागणी असल्याचं दिसते.`हेम सिक्युरिटीजच्या विश्लेषणानुसार, मिडकॅप आयटी कंपन्या लार्ज कॅप आयटी कंपन्यांच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी करतील. त्यानुसार, Mindtree, Persistent System आणि Mphasis या आमच्या दृष्टीनं टॉप पिक्स असतील.

    (हे वाचा:खूशखबर! BoB देतेय स्वस्त प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी; मिळवा तुमच्या हक्काचं घर)

    बाजारातील सद्य आणि आगामी स्थितीविषयी बोलताना मोहित निगम यांनी सांगितलं की, ``अनेक मजबूत फंडामेंटल फॅक्टर्समुळे (Fundamental Factors) भारतीय बाजारात आगामी काळातही तेजी कायम राहील. अन्य अॅसेट क्लासच्या तुलनेत इक्विटी चांगली कामगिरी करेल. भारत सरकारचे मेक इंडिया अभियान, चाइन+1 फॅक्टर, सरकारचा विकास आणि वृध्दीवर असणारा भर, उत्पादन वाढण्यासाठी असलेली पीएलआय योजना, वाढती परकिय गुंतवणूक, लसीकरणाचा वाढता वेग, प्रवासावरील उठवलेले निर्बंध या सर्वाचा सकारात्मक परिणाम मार्केटवर नक्कीच दिसेल.``

    First published:

    Tags: Money, Share market