नवी दिल्ली, 5 जानेवारी : सध्या देशाची आणि नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावलेलीच आहे. लॉकडाउननंतर उद्योगधंदे सुरू झाले असले तरीही आर्थिक परिस्थिती फारशी सुधारलेली नाही. त्यामुळेच सरकारी बँकांनी मुदत ठेवींवरील (Fixed Deposite FD) व्याजदर कमी केले आहेत. सामान्य नागरिकाला बचतीचा सर्वांत सुरक्षित पर्याय वाटतो तो एफडी. कोरोनानंतरच्या काळातही काही स्मॉल फायनान्स बँका 7 ते 7.50 टक्के व्याजदर देत आहेत.
जना स्मॉल फायनान्स बँक (Jana Small Finance Bank) -
>> ही बँक 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या FD ला 2.5 टक्क्यांपासून 7.25 टक्क्यांपर्यंत व्याज देते.
>> ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर जादाचे 50 बेसिस पॉइंट (basis points) मिळत आहेत.
>> ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर 3 टक्क्यांपासून 7.75 टक्क्यांपर्यंत व्याज देते.
>> 3 ते 5 वर्षांच्या आधीच्या मॅच्युरिटी पिरेड्सच्या ठेवींवर बँक सर्वाधिक व्याज देते.
>> जना स्मॉल फायनान्स बँकेचा नवा FD व्याज दर 22 डिसेंबरपासून लागू आहेत.
उत्कर्ष स्माल फायनान्स बँक (Utkarsh Small Finance Bank) -
>> ही बँक 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या FD ला 3 टक्क्यांपासून 7 टक्क्यांपर्यंत व्याज देते.
>> ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर 3.50 टक्क्यांपासून 7.50 टक्क्यांपर्यंत व्याज देते.
>> बँक 700 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहे.
>> सामान्य नागरिकांना व्याज दर 7 टक्के आहे.
>> ज्येष्ठांना 7.5 टक्के आहे.
>> हे दर 19 ऑक्टोबरपासून लागू आहेत.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक (Suryoday Small Finance Bank) -
>> ही बँक 4 टक्क्यांपासून 7.50 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.
>> 5 वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याजदर बँक देते.
>> यावर 7.50 टक्के व्याज मिळेल.
>> बँकेचे व्याज दर 15 सप्टेंबरपासून लागू आहेत.
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक (North East Small Finance Bank) -
>> ही बँक 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या FD ला 3 टक्क्यांपासून 7.5 टक्क्यांपर्यंत व्याज देते.
>> 730 दिवसांपासून 1095 दिवसांपर्यंतच्या एफडीवर बँक सर्वाधिक व्याज देते.
>> या डिपॉझिटवर 7.5 टक्के व्याज मिळतं.
>> नार्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेचे नवे व्याजदर 14 सप्टेंबरपासून लागू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.