मुंबई, 4 जानेवारी : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये (MMRC) टेक्निशियन, इंजिनियरसह अनेक पदांवर भरती सुरू झाली आहे. महाराष्ट्र मेट्रोमध्ये भरतीसाठी अनेक ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. ज्यात विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रताही वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार अधिकृत वेबसाईट mahametro.org वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2021 आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारा, पुणे रेल प्रोजेक्टअंतर्गत (pune metro rail project) विविध पदांवर भरतीसाठी वेगवेगळी शैक्षणिक योग्यता निश्चित आहे. ज्यात 10वी पासपासून ते ग्रॅज्युएटपर्यंतच्या उमेदवारांना अर्ज करण्याची संधी आहे.
टेक्निशियन पदासाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात, ज्यांनी संबंधित NCVT/SCVT मान्यता प्राप्त संस्थेमधून आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त केलेलं असावं. तर स्टेशन कंट्रोलर आणि ज्यूनियर इंजिनियर पदावर अर्ज करण्यासाठी मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनियरिंगच्या संबंधित ट्रेडमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. तसंच सेक्शन इंजिनियर पदासाठी, उमेदवार मान्यता प्राप्त संस्थेतून बीई किंवा बीटेक असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा -
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये टेक्निशियन, इंजिनियरसह अनेक पदांसाठी अर्ज करण्यासाठी कमीत-कमी वयोमर्यादा 18 तर अधिकाधिक वयोमर्यादा 28 वर्ष इतकी आहे.
अर्ज करण्यासाठी फी -
या सर्व पदांवर अर्ज करण्यासाठी जनरल आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना 400 रुपये अर्ज फी भरावी लागेल. तर इतर प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये फी भरावी लागेल.
कसा कराल अर्ज -
इच्छुक आणि योग्य उमेदवार महाराष्ट्र मेट्रोच्या अधिकृत वेबसाईट mahametro.org द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 14 डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकतात. नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
लेखी परीक्षा किंवा मुलाखतीच्या आधारे या सर्व पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.