Home /News /money /

Post Office च्या या योजनेत पैसे होतील डबल, पाहा कोणत्याही स्किममध्ये किती फायदा

Post Office च्या या योजनेत पैसे होतील डबल, पाहा कोणत्याही स्किममध्ये किती फायदा

पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये पैसे सुरक्षित राहतात आणि रिटर्न्सही चांगले मिळतात. काही अशा योजना आहेत, ज्यात पैसे डबल होतात.

  नवी दिल्ली, 29 मे : अनेकजण शेअर मार्केटसारख्या गुंतवणुकीच्या पर्यायात न पडता, सुरक्षित गुंतवणूक करणं पसंत करतात. अनेकांना सुरक्षित गुंतवणुकीसह त्यात रिटर्न्सही चांगले मिळावेत असा पर्याय हवा असतो. तुम्हीही अशाच पर्यायाच्या शोधात असाल एक चांगला ऑप्शन आहे. पोस्ट ऑफिसच्या (Post Office) योजनांमध्ये पैसे सुरक्षित राहतात आणि रिटर्न्सही चांगले मिळतात. काही अशा योजना आहेत, ज्यात पैसे डबल होतात. पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये (NSC) चांगले रिटर्न्स मिळतात. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट अर्थात NSC वर सध्या 6.8 टक्के व्याज दिलं जात आहे. ही एक 5 वर्ष बचत योजना आहे. यात गुंतवणूक करुन तुम्ही इन्कम टॅक्सही वाचवू शकता. या व्याज दराने पैशांची गुंतवणूक केली गेली, तर ही रक्कम साडे दहा वर्षात डबल होईल. पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये डबल पैसे मिळू शकतात. या योजनेत सध्या सर्वाधिक 7.6 टक्के व्याज मिळतं आहे. मुलींसाठी असलेल्या या योजनेत पैसे डबल होण्यासाठी जवळपास साडे नऊहून अधिक वर्ष लागू शकतात. पोस्ट ऑफिसच्या सीनियर सिटीजन सेव्हिंग स्किममध्ये (SCSS) सध्या 7.4 टक्के व्याज दिलं जातं. तुमचे पैसे या स्किममध्ये जवळपास साडे नऊ वर्षांत डबल होऊ शकतात.

  हे वाचा - Post Office खातेधारकांना होणार फायदा; 1 जूनपासून 'ही' खास सुविधा मिळणार

  पोस्ट ऑफिसची पल्बिक प्रॉव्हिडेंट फंड ही स्किमदेखील चांगल्या रिटर्न्ससाठी फायदेशीर ठरते. पल्बिक प्रॉव्हिडेंट फंड अर्थात (PPF) वर सध्या 7.1 टक्के व्याज मिळत आहे. म्हणजेच या रेटने तुमचे पैसे डबल होण्यासाठी जवळपास दहा वर्ष इतका वेळ लागेल. पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्किम (MIS) वर सध्या 6.6 टक्के व्याज मिळत आहे. या व्याजदराने गुंतवणूक केल्यास जवळपास 11 वर्षांत पैसे डबल होतील. पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्ही तुमचे पैसे ठेवले तर ते डबल होण्यासाठी अधिक काळ वाट पाहावी लागू शकते. कारण पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटमध्ये 4.0 टक्के वार्षिक व्याज मिळतं. म्हणजे तुमचे पैसे डबल होण्यासाठी 18 वर्ष लागू शकतात.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Post office bank, Post office money, Post office saving, Savings and investments

  पुढील बातम्या