Home /News /money /

Post Office खातेधारकांना होणार फायदा; 1 जूनपासून 'ही' खास सुविधा मिळणार

Post Office खातेधारकांना होणार फायदा; 1 जूनपासून 'ही' खास सुविधा मिळणार

सध्या आरटीजीएसच्या सेवेची चाचणी सुरू आहे. पोस्ट ऑफिस बचत खातेधारकांना या सुविधेचा फायदा होईल. कारण ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणे सोपे होणार आहे.

    मुंबई, 29 मे : पोस्ट ऑफिस बचत खातेधारकांसाठी (Post Office Saving Account) एक आनंदाची बातमी आहे. आता पोस्ट ऑफिसचे ग्राहक (Post Office Customers) इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर करू शकणार आहेत. आता 31 मे 2022 पासून ग्राहकांना RTGS ची सुविधा मिळण्यास सुरुवात होईल, म्हणजेच 1 जूनपासून ग्राहकांना नवीन सेवेचा लाभ घेता येणार आहे. पोस्ट ऑफिस खात्यातून ग्राहकांना ऑनलाइन पैसे पाठवणे (Online Money Transfer) पूर्वीपेक्षा सोपे होणार आहे. पोस्ट ऑफिसने अधिसूचना जारी केली आहे. पोस्ट ऑफिसने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की NEFT ची सेवा 18 मे पासून सुरू झाली आहे. त्याच वेळी, RTGS ची सेवा 31 मे 2022 पासून ग्राहकांना मिळण्यास सुरुवात होईल. सध्या आरटीजीएसच्या सेवेची चाचणी सुरू आहे. पोस्ट ऑफिस बचत खातेधारकांना या सुविधेचा फायदा होईल. कारण ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणे सोपे होणार आहे. Masked Aadhar Card: मास्क्ड आधारकार्डबद्दल माहित आहे का? कुठे केला जातो वापर? चेक करा सर्वकाही ऑनलाइन फंड ट्रान्सफर करण्यासाठी म्हणजे NEFT किती शुल्क भरावे लागेल? >> 10 हजारांपर्यंत - 2.50 रुपये आणि GST - >> 10 हजार ते 1 लाख - 5 रुपये आणि GST >> 1 लाख ते 2 लाख - 15 रुपये आणि GST >> 2 लाख वरील व्यवहारावर - 25 आणि GST तुमच्याकडील 500, 2000 ची नोट बनावट तर नाही ना? रिझर्व्ह बँकेच्या रिपोर्टने वाढली चिंता RTGS आणि NEFT काय आहे? ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्याची सर्वात जलद प्रक्रिया आहे. या प्रणालीद्वारे, पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात त्वरित ट्रान्सफर होतात. रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच RTGS 2 लाख किंवा त्याहून अधिक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जातो. तर NEFT मध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. ही सेवा ग्राहकांसाठी 24X7 उपलब्ध आहे. सरकारी सुट्टीच्या दिवशीही ही सेवा सुरु असते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Post office

    पुढील बातम्या