मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

INTERESTING! जर्मनीत दरमहा येतात दोन लाईट बिलं, पद्धत आहे अनोखी

INTERESTING! जर्मनीत दरमहा येतात दोन लाईट बिलं, पद्धत आहे अनोखी

 युरोपातील जर्मनी देशात (Citizen in Germany gets two electricity bills every month) सर्वसामान्य नागरिकांना दरमहा येणाऱ्या लाईटच्या बिलाची गोष्ट भारतापेक्षा काहीशी वेगळी आहे.

  • Published by:  desk news

बर्लीन, 25 ऑक्टोबर : युरोपातील जर्मनी देशात (Citizen in Germany gets two electricity bills every month) सर्वसामान्य नागरिकांना दरमहा येणाऱ्या लाईटच्या बिलाची गोष्ट भारतापेक्षा काहीशी वेगळी आहे. भारतात दरमहा (Light bill every month) लाईट बिल देण्यात येतं. शहरात राहणाऱ्या आणि साधारण तीन किंवा चार खोल्यांचं घर असणाऱ्यांना दरमहा 3 ते 4 हजार रुपयांचं लाईट बिल भरावं लागतं. मात्र जर्मनीत (Different system in Germany) काहीशी वेगळी पद्धत आहे.

काय आहे वेगळेपण

जर्मनी हा युरोपातील थंड प्रदेश म्हणून ओळखला जातो. वर्षातला बहुतांश काळ इथं कडाक्याची थंडी असते. इथल्या घरांना राहण्यायोग्य बनवण्यासाठी ती उबदार करणं अत्यावश्यक असतं. यासाठी प्रत्येक घराला हिटर लावून ते उबदार करण्यात येतं. त्याशिवाय प्रत्येक घरात गरम पाणी पुरवण्याची सरकारी सोयदेखील असते. या दोन्ही बाबींसाठी वेगवेगळी लाईट बिलं आकारण्यात येतात.

वेगवेगळी बिलं

नागरिक जेव्हा घर खरेदी करतात, तेव्हा त्या घराचं हिटरचं आणि पाण्याचं बिल भरण्याची जबाबदारी मालकांची असते. एखादं घर भाड्याने दिलेलं असलं, तरी बहुतांश वेळा घरमालकच हिटर आणि गरम पाण्याचं बिल भरताना दिसतात. तर घरात दिव्यांसाठी, इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी आणि इलेक्ट्रिक वस्तूंसाठी वापरल्या जाणाऱ्या वीजेचं वेगळं बिल पाठवलं जातं.

किती येत बिल?

हिटर आणि गरम पाणी यांच्या बिलाला जर्मन भाषेत Warmmiete असं म्हटलं जातं. दरमहा 90 ते 120 युरोपर्यंत हे लाईट बिल येतं. इंटरनेटवर तुम्ही शोधलं, तर जर्मनीतील सरासरी Warmmiete चं बिल किती येतं, ते समजू शकेल. तर मुख्य लाईट बिल हे अर्थातच प्रत्येकाच्या वापरावर अवलंबून असतं. कुणी किती लाईट वापरली, त्यावर त्याला येणारं बिल अवलंबून असतं. साधारणतः मध्यमवर्गीय कुटंबात 1500 ते 2000 किलोवॅट वीजेचा वापर केला जातो.

हे वाचा- भाषण सुरू असतानाच एकाने राज्यपालांच्या श्रीमुखात भडकावली, कारण वाचून व्हाल थक्क

वर्षअखेर वेगळं बिल

दरमहा आपण किती वीज वापरणार आहोत, हे प्रत्येकानं ठरवलेलं असतं. तेवढंच बिल त्याला दरमहा पाठवलं जातं. जर त्याने त्यापेक्षा अधिक वीज वापरली असेल, तर अतिरिक्त वापराचं एकत्रित बिल वर्षाच्या शेवटी पाठवण्यात येतं.

First published:

Tags: Electricity bill