• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • रिक्षा चालकाला भरावे लागणार 3 कोटी रुपये, INCOME TAX ने पाठवली नोटीस; वाचा सविस्तर

रिक्षा चालकाला भरावे लागणार 3 कोटी रुपये, INCOME TAX ने पाठवली नोटीस; वाचा सविस्तर

आयकर विभागानं एका सायकल रिक्षा (Rickshaw driver gets notice of 3 crore income tax) चालवणाऱ्या व्यक्तीला तब्बल 3 कोटी रुपये भरण्यासाठी नोटीस बजावली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : आयकर विभागानं एका सायकल रिक्षा (Rickshaw driver gets notice of 3 crore income tax) चालवणाऱ्या व्यक्तीला तब्बल 3 कोटी रुपये भरण्यासाठी नोटीस बजावली आहे. हे नोटीस पाहून रिक्षाचालकाच्या (Driver stunned to see the notice) पायाखालची जमीन सरकली आहे. हातावरचं पोट असणाऱ्या गरीब रिक्षाचालकाच्या हातात आयकर विभागानं नोटीस दिली आणि लवकरात लवकर 3 कोटी भरण्याचे आदेश दिले. काय आहे प्रकरण? प्रताप सिंह हे उत्तर प्रदेशच्या मथुरेत सायकल रिक्षा चालवण्याचं काम करतात. त्यांना आयकर विभागाकडून 3 कोटी रुपये इन्कम टॅक्स भरण्याची नोटीस आली. यामुळे धक्का बसलेले प्रताप सिंह हे थेट पोलीस ठाण्यात गेले आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला नसला तरी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हातावरचं पोट असलेल्या प्रताप सिंह यांच्या नावे कोट्यवधी रुपयांच्या इन्कम टॅक्सची नोटीस आलीच कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी याचा शोध घेतला असता धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली. हे वाचा- INTERESTING! जर्मनीत दरमहा येतात दोन लाईट बिलं, पद्धत आहे अनोखी पॅन कार्डचा झाला घोळ प्रताप सिंह यांना काही महिन्यांपूर्वी बँकेनं पॅन कार्ड सादर करण्याची सूचना केली होती. त्यानंतर त्यांनी जनसुविधा केंद्रात पॅनकार्डसाठी अर्ज केला. अनेकदा खेटे घालूनही त्यांना पॅनकार्ड मिळालं नाही. अखेर तिथल्या अधिकाऱ्यानं प्रताप सिंह यांना पॅन कार्डची कलर झेरॉक्स दिली. शिक्षण न झालेल्या प्रताप सिंह यांनी तेच खरं पॅन कार्ड आहे, असं समजून ते स्वतःपाशी ठेऊन घेतलं. मात्र दुसरीच व्यक्ती त्यांचं पॅन कार्ड वापरून कोट्यवधींचे व्यवहार करत असल्याचं पोलीस तपासात दिसून आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रं वेगानं फिरवली असून अशा प्रकारे पॅन कार्डचा घोटाळा करणारी मोठी टोळी समोर येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये या घटनेनं खळबळ उडाली आहे.
  Published by:desk news
  First published: