मराठी बातम्या /बातम्या /मनी /Tega Industries IPO: 1 डिसेंबरपासून 3 दिवस आहे कमाईची संधी, गुंतवणुकीसाठी राहा तयार

Tega Industries IPO: 1 डिसेंबरपासून 3 दिवस आहे कमाईची संधी, गुंतवणुकीसाठी राहा तयार

तुम्ही देखील भविष्यात बाजारामध्ये दाखल होणाऱ्या आयपीओमध्ये (Upcoming IPO) गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 1 डिसेंबर रोजी आणखी एका महत्त्वाच्या कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल होत आहे.

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: गेल्या काही महिन्यांपासून आयपीओ मार्केटमध्ये तेजी आली आहे. अनेक कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल झाले आहेत. अनेक आयपीओंनी गुंतवणूकदारांना (Investment in IPO) कमाईची सुवर्णसंधी मिळवून दिली आहे. दरम्यान तुम्ही देखील भविष्यात बाजारामध्ये दाखल होणाऱ्या आयपीओमध्ये (Upcoming IPO) गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मायनिंग इंडस्ट्रीसाठी सामान बनवणारी कंपनी टेगा इंडस्ट्रीज लिमिटेड (Tega Industries Ltd) चा आयपीओ (Tega Industries Ltd IPO) 1 डिसेंबर रोजी बाजारात दाखल होणार आहे. कंपनीने दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार हा आयपीओ 3 डिसेंबर रोजी बंद होणार आहे.

हा आयपीओ पूर्णपणे ओएफएस (OFS) अर्थात ऑफर फॉर सेल असणार आहे. या कंपनीला आयपीओतून कोणताही फंड मिळणार नाही आहे. टेगा इंडस्ट्रीज लिमिटेड लवकरच या आयपीओअंतर्गत प्राइस बँड आणि लॉट साइझ काय असेल याबाबतची माहिती जारी करेल.

हे वाचा-जगाला लुटून फरार झालीये ही Cryptocurrency क्वीन! गुंतवणूक करण्याआधी घ्या जाणून

आयपीओअंतर्गत प्रमोटर्स आणि एक सध्याच्या शेअरधारकांकडून 1,36,69,478 इक्विटी शेअर्सना ऑफर फॉर सेलअंतर्गत विक्रीसाठी जारी केले जाईल. प्रमोटर मदन मोहन मोहनका त्यांचे 33.14 लाख इक्विटी शेअर तर मनीष मोहनका 6.63 लाख इक्विटी शेअर्स विकतील. याशिवाय अमेरिका स्थित खासगी इक्विटी फर्म टीए असोसिएट्सशी संबंधित वॅगनर ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून 96.92 लाख शेअर्सची विक्री करतील. सध्या प्रमोटर आणि प्रमोटर्स ग्रुपची टेगा इंडस्ट्रीजमध्ये 85.17 टक्के भागीदारी आहे. तर वॅगनरची 14.54 टक्के भागीदारी आहे.

हे वाचा-LPG Subsidy हवी असेल तर आजच पूर्ण करा हे महत्त्वाचं काम, वाचा सविस्तर

जाणून घ्या कंपनीविषयी...

महसुलाच्या आधारे टेगा इंडस्ट्रीज पॉलीमर आधारित मिल लायनर्स बनवणारी देशातील दुसरी मोठी कंपनी आहे. टेगा इंडस्ट्रीजची स्थापना स्वीडनच्या स्केजा एबीच्या सहयोगाने भारतात 1978 साली झाली होती. त्यानंतर मदन मोहन मोहनका यांनी 2001 साली कंपनीतील स्केजा AB कडून संपूर्ण भागीदारी खरेदी केली.

First published:

Tags: Investment, Money