• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • LPG Subsidy हवी असेल तर आजच पूर्ण करा हे महत्त्वाचं काम, वाचा सविस्तर

LPG Subsidy हवी असेल तर आजच पूर्ण करा हे महत्त्वाचं काम, वाचा सविस्तर

LPG Subsidy: जर तुम्ही देखील सिलेंडर खरेदी करत असाल आणि पात्र असूनही सब्सिडी मिळत नसेल तर एक महत्त्वाचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर: घरगुती गॅस सिलेंडरवर (Rasoi Gas LPG Cylinder) ज्या ग्राहकांना सब्सिडी मिळते (Lpg Gas Cylinder) मिळते त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ग्राहकांच्या खात्यात सब्सिडीच्या स्वरुपात 79.26 रुपये पाठवले जात आहेत. जर तुम्ही देखील सिलेंडर खरेदी करत असाल आणि पात्र असूनही सब्सिडी मिळत नसेल तर एक महत्त्वाचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. तुम्हाला सब्सिडी मिळत नाही याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, तुमचा एलपीजी आयडी बँक खात्याशी लिंक नसेल. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. याकरता तुम्हाला तुमच्या जवळच्या डिस्ट्रिब्युटरशी संपर्क करावा लागेल. यानंतर तुम्ही तुमची समस्या त्यांना सांगू शकता किंवा टोल फ्री नंबर 18002333555 वर कॉल करून देखील तक्रार दाखल करू शकता. कुणाला मिळते सब्सिडी? एलपीजीची सब्सिडी राज्या-राज्यांमध्ये वेगळी आहे. दरम्यान ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना सब्सिडी दिली जात नाही. 10 लाख रुपयांचे हे वार्षिक उत्पन्न पती-पत्नी दोघांची मिळकत मिळून मोजले जाते. हे वाचा-खासगी Cryptocurrencies म्हणजे काय? सार्वजनिक क्रिप्टोपेक्षा त्या वेगळ्या कशा किती मिळतेय सब्सिडी? पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलिंडरवर (LPG Gas Cylinder Subsidy) सब्सिडी दिली जात आहे. अनुदानाचे पैसे ग्राहकांच्या खात्यावर ट्रान्सफर केले जात आहेत. माहितीनुसार, आता एलपीजी गॅस ग्राहकांना 79.26 रुपये प्रति सिलिंडर सब्सिडी म्हणून देण्यात येत आहे. दरम्यान काही ग्राहकांना 158.52 रुपये किंवा 237.78 सब्सिडी मिळत आहे. अशाप्रकारे तपासा स्टेटस >> http://mylpg.in/ वर जा आणि तुमचा LPG आयडी टाका. >> तुम्ही वापरत असलेल्या OMC LPG च्या आधारावर तुम्हाला आवश्यक माहिती द्यावी लागेल. >> तुमचा 17 अंकी LPG आयडी एंटर करा आणि मोबाईल नंबर नोंदवा. >> आता कॅप्चा कोड टाका आणि proceed वर क्लिक करा >> तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. हे वाचा-Go Fashion IPO: तुमच्या खात्यात पैसे येणार की शेअर्स ते अशाप्रकारे तपासा >> आता तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकून पासवर्ड तयार करावा लागेल >> यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर एक लिंक मिळेल. तुमच्या मेलवर जाऊन तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करावे लागेल. >> आता mylpg.in खात्यावर लॉग इन करा आणि पॉप-अप संदेशामध्ये तुमचा तपशील प्रविष्ट करा. >> याठिकाणी तुम्ही सिलेंडर बुकिंग हिस्ट्री/सब्सिडी ट्रान्सफर या हे पर्याय तपासून सब्सिडीचे स्टेटस पाहू शकता.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: