मुंबई, 02 ऑक्टोंबर : चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणपतीचं आज घराघरांत आगमन मोठ्या जल्लोषात होतं आहे. बाप्पाच्या पुजनात दुर्वांची जुडी आणि मोदकाचा नैवद्य अग्रस्थानी असतो. पण घराघरात पुजली जाणारी तुळस मात्र बाप्पाला वर्ज्य मानली जाते. वर्षातून फक्त एकच दिवस गणेश चतुर्थीला ती गणपतीला वाहिली जाते. सर्व देवदेवतांच्या पुजेत स्थान मिळवणाऱ्या तुळशीला गणेशपुजेत स्थान न देण्यामागं काही कथा सांगितल्या जातात. पौराणिक कथेनुसार, धर्मराजाची कन्या वृंदाने विष्णूसोबत विवाह करण्याचा हट्ट केला होता. तेव्हा देवाशी लग्नाऐवजी मानवी वर शोधू असं म्हटलं. त्यानंतर वृंदाने विष्णूची आराधना केली. ध्यानधारणा आणि तप केले. एकदा ती भगीरथी नदीच्या काठावरून जात असताना ध्यानाला बसलेल्या गणेशाला तिनं पाहिलं. त्याच्या तेजानं प्रभावित झालेल्या वृंदानं गणपतीला हाक मारण्यास सुरुवात केली. यामुळं त्याच्या तपस्येत अडथळा निर्माण झाला. याचं कारण गणपतीनं तिला विचारलं. त्यावर वृंदा म्हणाली, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. गणपती म्हणाला की, मी मोहपाषात अडकणार नाही. मी ब्रम्हचर्याच्या मार्गावर आहे. मी विवाह करणार नाही. गणेशाच्या या उत्तरानं आपला अपमान झाल्याचं समजून त्याला शाप दिला की, तुझा विवाह होईल. वृंदेन दिलेल्या शापावर गणपतीनंही शाप दिला की, तुझा विवाह एका राक्षसासोबत होईल. माझ्या पुजेत तुला स्थान नसेल. गणपतीच्या शापानंतर वृंदाला तिची चूक समजली. तिनं गणपतीची माफी मागितली. त्यानंतर वृंदानं गणपतीची उपासना केली. तेव्हा प्रसन्न होऊन गणपती म्हणाला की, तुला माझ्या पुजेत वर्षातून फक्त एकदात स्थान मिलेल. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला तुळस वाहता येईल. या दिवशी वाहिल्या जाणाऱ्या 21 प्रकारच्या पत्रींमध्ये तुलाही स्थान असेल मात्र इतर कोणत्याही दिवशी तुळस वाहता येणार नाही. पुढच्या जन्मात वृंदाचा जन्म एका राक्षसाच्या पोटी झाला. त्यानंतर महापराक्रमी अशा राक्षसासोबत विवाह झाला. त्याचा मृत्यू होताच तिनं चितेत उडी घेऊन प्राणत्याग केला आणि वृक्षरुपात तुळस झाली. त्यानंतर तुळशीला विष्णूपत्नी मानलं जाऊ लागलं. विष्णू पत्नी म्हणून तिची पुजा करतात मात्र तरीही गणपतीच्या पुजेत आजही तुळस वर्ज्य मानली जाते. फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशीच गणपतीच्या पुजेत तुळशीला मान मिळतो. लालबागच्या राजाला भक्तांची अलोट गर्दी, पाहा LIVE VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.