मुंबई, 10 मे : नवं आर्थिक वर्ष सुरू होऊन फार वेळ झालेला नाही. तुम्ही गुंतवणुकीचं काही प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट आॅफिसची खास बचत योजना उपयोगी ठरू शकते. या योजनेमुळे तुमची दर महिन्याला चांगली कमाई होऊ शकेल. तज्ज्ञांच्या मते ही योजना अशा लोकांसाठी उपयुक्त आहे जे आपल्या कमाईवर अजून जास्त कमाई करू इच्छितात किंवा असे लोक ज्यांच्याकडे कमाईचं काही साधन नाही. काय आहे योजना? पोस्ट आॅफिसमध्ये मंथली इन्वेस्टमेंट स्किम म्हणजे जीओएमआयएसमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. यात एकदा का तुम्ही गुंतवणूक केलीत की दर महिन्याला तुमची कमाई होऊ शकते. तज्ज्ञ गुंतवणुकीसाठी हा सर्वात चांगला पर्याय समजतात. कारण त्यात 4 मोठे फायदे आहेत. ‘मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास अमित शहा होतील गृहमंत्री’, केजरीवालांचं ट्वीट मिळतात हे 4 फायदे ही गुंतवणूक कुणीही करू शकतं. तुमची मुद्दल कायम राहते. बँक एफडी किंवा डेट इन्स्ट्रुमेंटच्या तुलनेत तुम्हाला चांगले रिटर्न मिळू शकतात. यामुळे दर महिन्याला तुमची ठराविक कमाई सुरू राहते.ही स्किम पूर्ण झाल्यानंतर पूर्ण मुद्दल मिळते. ती तुम्ही पुन्हा याच योजनेत गुंतवू शकता आणि पुन्हा दर महिन्याची कमाई सुरू होऊ शकते. तुमच्या मुलांसाठी उघडू शकता खातं - तुम्ही तुमच्या मुलांच्या नावे अकाउंट उघडू शकता. तुमचं मूल 10 वर्षाचं असेल तर आई-वडील किंवा कायदेशीर पालकांकडून खातं उघडता येतं. मुलगा किंवा मुलीचं वय 10 वर्ष असेल तर तो किंवा ती स्वत: अकाउंट हाताळू शकते. प्रौढ झाल्यावर ते स्वत: जबाबदारी घेतील. जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठं यश, ISJKच्या कमांडरचा खात्मा या कागदपत्रांची गरज - तुम्ही कुठल्याही पोस्ट आॅफिसमध्ये जाऊन अकाउंट सुरू करू शकता. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, मतदान आयडी, पॅन कार्ड, रेशन कार्ज, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एकाची झेराॅक्स जमा करावी लागेल. याशिवाय अॅड्रेस प्रूफही द्यावं लागेल. यात तुमच्या ओळखपत्राचा उपयोग होऊ शकतो. याशिवाय 2 पासपोर्ट साइज फोटोग्राफ जमा करावे लागतील. दर महिन्याला किती पैसे जमा करावे लागतील? - तुमचं अकाउंट सिंगल असेल तर त्यात जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये जमा करावे लागतील. त्यात कमीत कमी 1500 रुपये जमा करू शकता. तुमचं अकाउंट जाॅइंट असेल तर जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करू शकता. एक व्यक्ती एकापेक्षा जास्त आणि पोस्ट आॅफिसनं ठरवलेल्या मर्यादेत अकाउंट उघडू शकतात. ‘तारक मेहता का..’ मधील अभिनेत्याच्या दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू मिळेल कर सवलत ?- यात जमा केलेल्या रकमेमुळे तुम्हाला करात सवलत मिळणार नाही. पण यावरचा तुमचा टीडीएस कापला जात नाही. पण जे व्याज तुम्हाला मिळतं त्यावर कर बसू शकतो. दर महिन्याला होणार कमाई - या गुंतवणूक योजनेत तुम्हाला 7.3 टक्के व्याज मिळणार आहे. हे व्याज दर महिन्याला दिलं जातं. तुम्ही 9 लाख रुपये जमा केलेत तर वर्षाचं व्याज 65700 रुपये होईल. म्हणजे महिन्याला 5500 रुपये मिळतील. शिवाय मॅच्युरिटी पिरियडनंतर तुम्हाला ते पैसे आणि बोनस परत मिळेल. दर महिन्याला पैसे काढले नाहीत तर? - ते पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये राहतील आणि मुद्दल, ही रक्कम मिळून व्याज मिळेल. योजनेचा मॅच्युरिटी पिरियड 5 वर्षांचा आहे. 5 वर्षांनंतर तुम्ही हीच मुद्दल घेऊन गुंतवणूक करू शकता. मॅच्युरिटी आधी पैसे काढायचे असतील तर? - ही सुविधा 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळेल. अकाउंट उघडल्यानंतर 1 वर्षापासून 3 वर्षापर्यंत अकाउंट असेल तर त्यात जमा झालेल्या रकमेतली 2 टक्के रक्कम कापून बाकी रक्कम मिळते. अकाउंट 3 वर्षापेक्षा जास्त जुना असेल तर त्यात जमलेल्या रकमेच्या 1 टक्के रक्कम कापून तुम्हाला पैसे मिळू शकतील. SPECIAL REPORT: राज ठाकरे इफेक्ट आणि अंतर्गत वाद, युतीच्या 16 जागा धोक्यात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.