CA च्या पदासाठी मोठी भरती, 'असा' करा अर्ज

या 10 पदांमध्ये चार्टर्ड अकाउंटंट, काॅस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी या पदांचा समावेश आहे.

News18 Lokmat | Updated On: May 10, 2019 02:05 PM IST

CA च्या पदासाठी मोठी भरती, 'असा' करा अर्ज

मुंबई, 10 मे : काॅर्पोरेट कार्य मंत्रालयानं नॅशनल फायनान्स रिपोर्टिंग ( एनएफआरए )मध्ये 10 पदांवर भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केलीय. या 10 पदांमध्ये चार्टर्ड अकाउंटंट, काॅस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी या पदांचा समावेश आहे. ही पदं काॅन्ट्रॅक्टवर भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज तुम्ही पोस्टानं पाठवू शकाल. यासाठी अंतिम तारीख आहे 27 मे 2019.

'ही' आहे Post Office ची सर्वोत्तम योजना, दर महिन्याला मिळवा 5,500 रुपये

पदाची नावं - चार्टर्ड अकाउंटंट, काॅस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी

पदांची संख्या - 10

अर्ज करणारा मान्यताप्राप्त संस्थेमधून चार्टर्ड अकाउंटंट, काॅस्ट अकाउंट, कंपनी सेक्रेटरी या परीक्षा उत्तीर्ण झालेला असला पाहिजे. संबंधित क्षेत्रात त्याला कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव हवा.

Loading...

'भारताला तोडणारा प्रमुख', 'TIME' मासिकाकडून मोदींचा वादग्रस्त उल्लेख

वय मर्यादा - ठरलेली नाही

पगार - 40 हजार रुपये

अर्ज शुल्क - या पदांसाठी अर्ज करायला काही पैसे पडणार नाहीत.

निवड प्रक्रिया - इंटरव्ह्यूच्या आधारे निवड होईल.

उमेदवारांनी www.mca.gov.in वर लाॅग इन करा. होमपेज उघडल्यावर नोटिस अँड सर्कुलर्सवर जा. नंतर Engagement Of NAFRA Dated (77 KB) लिंकवर क्लिक करा.

लिंकवर क्लिक केल्यावर संबंधित जाहिरात उघडेल. अर्ज करण्याआधी ते काळजीपूर्वक वाचा. जाहिरातीला अर्ज जोडून ए4 साइजचं प्रिंट आऊट काढा.

पाणीटंचाई जीवावर बेतली.. परळीत शॉक लागून एकाचा मृत्यू

त्यानंतर ते सर्व खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

पोस्टानं अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 27 मे 2019

अर्ज पाठवण्याचा पत्ता

सेक्रेटरी, नॅशनल, फायनॅन्शियल रिपोर्टिंग अथाॅरिटी, एचटी हाऊस, 18-20 के.जी.मार्ग, नवी दिल्ली - 110001

अधिक माहितीसाठी तुम्ही www.mca.gov.in वर लाॅग इन करा.


VIDEO: रॉबर्ट वाड्रा मुंबादेवीच्या दर्शनाला, म्हणाले 'अच्छा समय आएगा'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cajobs
First Published: May 10, 2019 02:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...