Home /News /money /

वायदे बाजारात सोन्याचांदीमध्ये मोठी घसरण, मौल्यवान धातूंची झळाळी उतरली

वायदे बाजारात सोन्याचांदीमध्ये मोठी घसरण, मौल्यवान धातूंची झळाळी उतरली

वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीने शुक्रवारी मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी मोठ्या घसरणीनंतर वायदे बाजार बंद झाला. चांदीमध्ये देखील घसरण झाली आहे.

    नवी दिल्ली, 18 एप्रिल : वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीने शुक्रवारी मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी मोठ्या घसरणीनंतर वायदे बाजार बंद झाला. चांदीमध्ये देखील घसरण झाली आहे. वायदे बाजारात एमसीएक्स एक्सचेंजमध्ये शुक्रवारी  5 जून 2020 साठी सोन्याच्या वायदा भाव 3.33 टक्क्यांनी म्हणजेच 1573 रुपयांनी कमी झाला. परिणामी सोन्याची वायदे बाजारातील किंमत प्रति तोळा 45,685 रुपये इतकी होती. (हे वाचा-वार्षिक 27 हजार जमा करून मिळतील 10 लाख, जाणून घ्या LIC ची बेस्ट पॉलिसी) 5 ऑगस्टसाठी सोन्याचा वायदे भाव देखील उतरला आहे.  5 ऑगस्टसाठीचा वायदे भाव एमसीएक्स एक्सचेंजमध्ये शुक्रवारी 3.28 टक्के म्हणजेच 1554 रुपयांनी कमी झाला. परिणामी सोन्याची वायदे किंमत प्रति तोळा 45,895 रुपयांवर पोहोचली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमती उतरल्या आहेत. चांदीच्या वायदा किंमतीतही शुक्रवारी मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर 5 मेच्या चांदीच्या वायदा किंमतीत 1588  रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. परिणामी प्रति किलो चांदीची किंमत 42,667 रुपयांवर पोहोचली आहे. 3 जुलैच्या चांदीच्या वायदा किंमतीतही 1571 रुपयांची घसरण होत चांदी प्रति किलो 43,220 रुपयेवर पोहोचली आहे. वर्षाअखेरीस सोनं 55 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे देशातील सोन्याच्या बाजारपेठा बंद आहेत. सध्या लग्नसमारंभ किंवा इतर सोहळे रद्द झाल्यामुळे सोन्याची मागणी देखील कमी झाली आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा मोठा परिणाम सोने व्यापारावर होत आहे. 2019मध्ये 23.74 टक्के रिटर्न दिल्यानंतर सोन्याच्या किंमती अशाच वाढत राहण्याचा अंदाज आहे. (हे वाचा-110 महिन्यात होणार पैसे दुप्पट, जाणून घ्या मोदी सरकारची ही योजना 2020 च्या अखेरपर्यंत सोन्याच्या किंमती 1,800 डॉलर प्रति औंस म्हणजेच साधारण 50,000 ते 55,000 प्रति तोळापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सध्या अर्थव्यवस्थेमध्ये असणारी अस्थिरता, अर्थव्यवस्थेबाबत असणारी भीती या सर्व कारणांमुळे सोन्याच्या पुढील 2-3 वर्षांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. संपादन- जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold and silver prices today

    पुढील बातम्या