जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Income Tax: टॅक्सपेयर्ससाठी गुड न्यूज! आता PhonePe वरुनही भरता येणार इन्कम टॅक्स, जाणून घ्या प्रोसेस

Income Tax: टॅक्सपेयर्ससाठी गुड न्यूज! आता PhonePe वरुनही भरता येणार इन्कम टॅक्स, जाणून घ्या प्रोसेस

इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स

Income Tax Payment: तुम्ही अजुनही तुमचा इन्कम टॅक्स जमा केला नसेल तर आता हे काम फोन पेच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं. आज आम्ही याची पूर्ण प्रोसेस सांगणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 जुलै : आर्थिक वर्ष 2022-23 आणि मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ येतेय. इन्कम टॅक्स विभाग लोकांना वारंवार मुदतीच्या आत आयटीआर भरण्याचा सल्ला देत आहे. दुसरीकडे, जर तुम्ही अद्याप आयकर जमा केला नसेल, तर तुम्ही हे काम देशातील मोठ्या डिजिटल पेमेंट अ‍ॅप फोन पे वरून सहज करू शकता. Phone Pe ने इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची सर्व्हिस लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या सर्व्हिसद्वारे, पगारदार व्यक्ती आणि बिझनेस दोघेही त्यांचे टॅक्स जमा करू शकतात. फोन पेद्वारे टॅक्स जमा करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यासाठी तुम्हाला टॅक्स पोर्टलवर लॉग इन करण्याची गरज नाही.

News18लोकमत
News18लोकमत

फोन पे आणि PayMate मध्ये झाली पार्टनरशिप इन्कम टॅक्स फायलिंगची सुविधा प्रदान करण्यासाठी फोन पेने डिजिटल पेमेंट आणि सर्व्हिस प्रदान करणारी कंपनी PayMate सोबत पार्टनरशिप केली आहे. या पार्टनरशिपनंतर नोकरदार व्यक्ती आणि बिझनेस करणारे लोक दोन्हीही आर्थिकवर्ष 2022-23 साठी आपला टॅक्स पेमेंट करु शकतात. या सुविधेविषयी माहिती देताना फोनपेने म्हटलं की, आता आयटीआर फाइल करण्यासाठी टॅक्सपेयर्सला लॉगिनच्या त्रासातून सुटका मिळणार आहे. आता ते सहजपणे टॅक्स जमा करू शकतील. यासोबतच आता टॅक्सपेयर्स आपल्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून टॅक्स जमा करुन 45 दिवसांच्या इंटरेस्ट फ्री पीरियडचा लाभ घेऊ शकतात. एकदा टॅक्स जमा केल्यानंतर त्यांना एक वर्किंग डेच्या आत यूनिक ट्रांझेक्शन रेफरेंस (UTR) नंबर मिळेल. तसंच टॅक्स पेमेंटचं चालान दोन वर्किंग डेच्या आत मिळेल. ITR filing : 31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर काय? किती लागेल दंड? एका क्लिकवर घ्या जाणून PhonePe वर ITR कसा दाखल करावा -यासाठी फोन पे अॅप उघडा आणि इन्कम टॅक्स ऑप्शन निवडा. -यानंतर, तुम्हाला जमा करायची असलेली टॅक्सची रक्कम, मूल्यांकन वर्ष आणि पॅन कार्ड डिटेल्स टाका. -नंतर इच्छित रक्कम इंटर करा आणि पेमेंटचा ऑप्शन निवडा. -यानंतर, पेमेंट केल्यानंतर दोन वर्किंडेमध्ये तुम्हाला पोर्टलचा UTR नंबर मिळेल, जो पोर्टलवर अपडेट करा. ITR भरण्याची डेडलाइन वाढणार का? पाहा सरकारने काय म्हटलं टॅक्स पेमेंट झाली सोपी Phone Pe वर टॅक्स पेमेंट फीचर लॉन्च करताना Phone Pe ने म्हटले आहे की, आयकर भरणे ही नेहमीच कठीण प्रक्रिया राहिली आहे. अशा वेळी फोन पेने टॅक्सपेयर्सला टॅक्स भरण्याचा सोपा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. टॅक्स भरल्यानंतर, यूझर्सला दोन दिवसांत UTR नंबर मिळेल. ज्याची माहिती इन्कम टॅक्स पोर्टलवर अपडेट केली जाऊ शकते. लक्षात ठेवा की, फोन पेद्वारे तुम्ही फक्त इन्कम टॅक्स जमा करु शकता. पण रिटर्न तुम्हाला पोर्टलवरच जमा करावा लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात