मुंबई : निवडणुकीपूर्वी बजेटमध्ये मोदी सरकारने नवीन बदल केले आहेत. टॅक्स स्लॅब वाढवला असून त्यासोबत EPFO चे नियमही बदलले आहेत. आता पूर्वीसारखे सतत EPFO मधून तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत. तुम्हाला पैसे काढताना त्यावर करही द्यावा लागणार आहे. मात्र थांबा टेन्शन घेऊ नका. नव्या नियमानुसार तुम्हाला कधी टॅक्स लागणार आणि कधी नाही लागणार हे सोप्या भाषेत समजून घ्या. PF खातं मर्ज करणं गरजेचं तुम्ही नोकरीला लागता तेव्हा तुम्हाला कंपनीकडून एक UAN नंबर दिला जातो. हा नंबर म्हणजे तुमचं EPFO मध्ये खातं आहे याचा पुरावा असतो. तो अॅक्टिवेट करणं गरजेचं आहे. तुमची कंपनी या UAN अंतर्गत पीएफ खाते उघडते, तुम्ही आणि तुमची कंपनी दोघेही दरमहा त्यात योगदान देता.
PF अकाउंटवरुन बॅलेन्स चेक करणं झालं सोपं! इंटरनेटशिवायही काढता येईल माहितीजेव्हा तुम्ही नोकरी बदलता, तेव्हा तुम्ही तुमचा UAN नवीन कंपनीला देता, जो नंतर त्याच UAN अंतर्गत दुसरे PF खाते उघडलं जातं. तुमचे पूर्वीचे पीएफ खाते नंतर उघडलेल्या नवीन खात्यात मर्ज करणं आवश्यक आहे.
कधी द्यावा लागेल टॅक्स? तुम्ही पीएफ खात्यातून 5 वर्षांनंतर पैसे काढले तर तुम्हाला टॅक्स लागणार नाही. जर 5 वर्ष पूर्ण होण्याआधी तुम्ही पीएफ काढला तर त्यावर टॅक्स लागू शकतो. 5 वर्षापूर्वी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढले आणि ग्राहकांचे पॅन कार्ड लिंक केले नाही तर 20 टक्के टॅक्स कापला जाणार आहे. दुसरीकडे, जर तुमचे पीएफ खाते पॅनशी जोडलेले असेल, तर 10% दराने टीडीएस कापला जाईल.
जास्त पेन्शन हवीये ना? फक्त एक दिवस शिल्लक, लवकर करा हे काम, अन्यथा…या लोकांना नाही द्यावा लागणार टॅक्स कर्मचाऱ्याला तब्येत बिघडल्याने जर नोकरी सोडण्याची वेळ आली किंवा व्यवसाय बंद पडला त्यामुळे कामगारांची किंवा कर्मचाऱ्यांची नोकरी गेली तर त्यांना PF काढताना टॅक्स भरावा लागणार नाही. दुसरं म्हणजे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करताना कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही.