मुंबई, 2 मे: जर तुम्ही EPFO चे सदस्य असाल आणि तुम्हाला जास्त पेन्शन मिळवायची असेल तर तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी फक्त आजचा आणि उद्याचा दिवस शिल्लक आहे. ईपीएफओने अर्जासाठी 3 मे ही अंतिम मुदत निश्चित केली होती. आतापर्यंत ही तारीख आणखी वाढवण्याची कोणतीही माहिती आलेली नाही. मात्र, 1 सप्टेंबर 2014 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाच उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ घेता येईल.
यापूर्वी रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जास्त पेन्शनची सुविधा मिळणार नाही. ईपीएफओने यापूर्वी पेन्शन फंडामध्ये केवळ 15,000 रुपये उत्पन्नाची मर्यादा ठेवलेली होती. यापेक्षा जास्त रक्कम पेन्शन फंडात गुंतवता येत नव्हती. ही मर्यादा रद्द करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. हे लक्षात घेऊन ही मर्यादा रद्द करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने 4 नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशात पात्र खातेदारांना अर्जासाठी 4 महिन्यांची मुदत दिली होती, ज्याची मुदत 3 मार्च रोजी संपली होती. मात्र, ती आणखी वाढवून 3 मे करण्यात आली.
करदात्यांनो चुकूनही विसरु नका मे महिन्यातील ‘या’ चार तारखा, अन्यथा…तुम्ही किती गुंतवणूक करु शकता
जे लोक हायर पेन्शनचा पर्याय निवडतात त्यांना त्यांच्या बेसिक सॅलरीच्या 8.33 टक्के रक्कम पेन्शन फंडात जमा करण्याची सूट असेल. यापूर्वी, कर्मचारी 15,000 रुपयांपर्यंतच्या पगाराच्या 8.33 टक्के पेन्शन फंडात टाकू शकत होता. जुन्या पद्धतीत मालक आणि कर्मचारी दोघेही पगाराच्या 12-12 टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये टाकतात. पगारामध्ये मूळ वेतन आणि महागाई भत्ता (DA) समाविष्ट आहे. कर्मचार्यांचे संपूर्ण पैसे पीएफमध्ये जातात तर नियोक्त्याचा 3.67 टक्के हिस्सा पीएफ आणि 8.33 टक्के ईपीएसमध्ये जातो. पेन्शन फक्त EPS मधून मिळते. पूर्वी कमाल 15000 रुपयांपर्यंतच्या पगारानुसार ईपीएसमध्ये केवळ 8.33 टक्के हिस्सा जात होता. आता ही 15,000 ची मर्यादा रद्द करण्यात आली आहे. जर कोणतीही बेसिक सॅलरी आणि डीए यापेक्षा वर गेला तर त्या रकमेच्या 8.33 टक्के ईपीएसमध्ये जाईल.
तुम्हीही होम लोन घेतलंय का? कधीच करु नका या चुका, अन्यथाकोण अर्ज करू शकतो
-1 सप्टेंबर 2014 पर्यंत ईपीएफओचे मेंबर राहिलेले लोक -1 सप्टेंबर 2014 च्या पूर्वीपासून ईपीएसचे सदस्य असणारे लोक -15,000 च्या लिमिटपेक्षा जास्त योगदान करणारे लोक -जे लोक ईपीएफचे सदस्य 1 सप्टेंबर 2014 नंतर बनले होते ते लोक
अर्ज कसा करायचा?
तुम्ही EPFO वेबसाइटला भेट देऊन हायर पेन्शनसाठी अर्ज करू शकता. येथे त्यांना त्यांचा UAN, नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक, आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर सादर करावा लागेल. यानंतर त्यांना एक ऑथोरायझेशन पिन मिळेल ज्याचा वापर करून ते आपला अर्ज सबमिट करू शकतात. एक यासोबतच ईपीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज उपलब्ध आहे परंतु ईपीएसच्या रकमेवर अशी कोणतीही तरतूद नाही.