जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PF अकाउंटवरुन बॅलेन्स चेक करणं झालं सोपं! इंटरनेटशिवायही काढता येईल माहिती

PF अकाउंटवरुन बॅलेन्स चेक करणं झालं सोपं! इंटरनेटशिवायही काढता येईल माहिती

पीएफ बॅलेन्स कसं चेक करायचं?

पीएफ बॅलेन्स कसं चेक करायचं?

तुम्हालाही तुमचं बॅलेन्स चेक करायचं असेल आणि तुमच्याकडे इंटरनेट किंवा मोबाइल डेटा नसेल तर काळजी करण्याची गरज नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 मे : तुमच्या पीएफ अकाउंटवर किती पैसे आहेत किंवा किती व्याज ट्रान्सफर झाले आहेत हे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने चेक करुन शकता. हे चेक करण्यासाठी तुम्हाला आता मोबाइल डेटाची गरज नाही. हे काम तुम्ही इंटरनेटशिवायही करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून फक्त मिस कॉल किंवा एसएमएस करावा लागेल. त्यानंतर लगेचच तुम्हाला तुमचं बॅलेन्स कळेल.

News18लोकमत
News18लोकमत

देशभरातील कोट्यवधी लोक त्यांच्या पगाराचा काही भाग प्रोव्हिडेंट फंडमध्ये जमा करतात. आपत्कालीन परिस्थितीत किंवा रिटायरमेंटनंतर कर्मचारी हे पैसे काढू शकतात. पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर सरकार वेळोवेळी व्याज ट्रान्सफर करते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या खात्यात जमा झालेली एकूण रक्कम तपासायची असेल, तर तुम्ही आता हे काम सहज करू शकता.

मेलचा पासवर्ड पुन्हापुन्हा विसरता का? पाहा हा Viral Video, अवश्य मिळेल फायदा

विना इंटरनेट असं चेक करा PF बॅलेन्स

1. तुम्ही SMS द्वारे तुम्ही बॅलेन्स चेक करु शकता EPFO रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन EPFO ​​UAN LAN (भाषा) 7738299899 वर पाठवावी लागेल. LAN म्हणजे तुमची भाषा. इंग्रजीत माहिती हवी असल्यास LAN ऐवजी ENG लिहावे लागेल. त्याचप्रमाणे हिंदीसाठी HIN आणि मराठीसाऱी MAR लिहा. हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला EPFOHO UAN HIN लिहून मेसेज करावा लागेल. 2 मिस्ड कॉलद्वारे तुम्ही डिटेल्स तपासू शकता तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही मिस्ड कॉलद्वारे तुमचे EPF बॅलेन्स देखील चेक करु शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 011 22901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

सोशल मीडियावर जाहिरात पाहून प्रोडक्ट्स मागवताय? होऊ शकते फसवणूक, असा करा बचाव

ऑनलाइन असं चेक करा बॅलेन्स

3. वेबसाइटद्वारे तुमचं बॅलेन्स ऑनलाइन चेक करण्यासाठी EPF पासबुक पोर्टलला भेट द्या. तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून या पोर्टलवर लॉग इन करा. यामध्ये Download/View Passbook वर क्लिक करा आणि नंतर पासबुक तुमच्या समोर उघडेल ज्यामध्ये तुम्ही बॅलेन्स पाहू शकता. 4.उमंग अॅपद्वारे तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही हवं तेव्हा अॅपद्वारे तुमचं ईपीएफ बॅलेन्स तपासू शकता. यासाठी उमंग अॅप ओपन करून EPFO ​​वर क्लिक करा. यामध्ये Employee Centric Services वर क्लिक करा आणि नंतर View Passbook वर क्लिक करा. आता UAN आणि पासवर्ड टाका. रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल. हे टाकल्यानंतर, तुम्ही EPF बॅलेन्स पाहू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात