मराठी बातम्या /बातम्या /मनी /बँक FD वर कर लाभांसह मिळवा चांगला परतावा, याहून अधिक आहेत फायदे; वाचा सविस्तर

बँक FD वर कर लाभांसह मिळवा चांगला परतावा, याहून अधिक आहेत फायदे; वाचा सविस्तर

Fixed deposit

Fixed deposit

गुंतवणुकीसाठी बहुतेक लोक मुदत(Bank Fixed Deposit) ठेवीला प्राधान्य देताना दिसतात. मुदत ठेवीमध्ये चांगल्या व्याज दरांव्यतिरिक्त इतरही अनेक फायदे होतात.

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर:  पैशांची बचत आणि गुंतवणूक ही काळाची गरज आहे. त्यासाठी बँकांमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणुकीसाठी बहुतेक लोक मुदत (Bank Fixed Deposit) ठेवीला प्राधान्य देताना दिसतात. मुदत ठेवीमध्ये चांगल्या व्याज दरांव्यतिरिक्त इतरही अनेक फायदे मिळतात. त्यामुळे बचतीचा हा सर्वात लोकप्रिय पर्याय झाला आहे. बँक एफडीवर विमा आणि आयकर सूट (Income Tax Exemption) उपलब्ध आहे. काही बँका तर आपल्या खातेदारांना आरोग्य सुविधा (Healthcare Benefits) देखील पुरवत आहेत. त्यामुळे बँक एफडी करताना मिळणाऱ्या विविध सुविधांचा विचार करूनच एफडी करावी.

कमी वयातही सुरू करू शकता एफडी

सध्या आपल्यासमोर गुंतवणुकीच्या पर्यायांची कमतरता नाही. तरीही योग्य पर्याय निवडून गुंतवणूक करणं हे मोठं आव्हान आहे. तसं पहायला गेलं तर एफडी हे गुंतवणुकीचं नवीन साधन नाही, परंतु बाजारातील अस्थिरता लक्षात घेता तो नक्कीच एक स्मार्ट पर्याय ठरतो. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एफडी खाते (FD Account) कमी रकमेत आणि लहान वयातही उघडता येतं. यावर सुरक्षेच्या हमीसह चांगला परतावादेखील मिळतो. एफडी करण्याचे कोणते फायदे आहेत ते आपण पाहूया.

हेही  वाचा- 'Amazon म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी 2.0', संघाच्या मुखपत्रातून अमेरिकी कंपनीवर टीकास्त्र

 बचतची सवय आणि परताव्याची हमी

एफडी केल्यामुळे आपल्याला कमी वयात बचतीची सवय लागते. यात इतर गुंतवणूक पर्यायांप्रमाणे व्याज दरांत चढउतार नसतात त्यामुळे सुरक्षेची आणि परताव्याची हमी मिळते.

घरी बसून सुरू करता येते एफडी

ग्राहकांना आता घरी बसून आपले एफडी खाते सुरू करता येते. इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे एफडी खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. अगदी काही मिनिटांत तुम्ही एफडी खातं सुरू करू शकता.

हेही वाचा- घरबसल्या अशी करता येईल कमाई, दररोज 4 ते 5 तास काम करुन मिळेल इतकी रक्कम

विमा आणि आरोग्यसेवांचाही मिळतो लाभ

एफडी हा सर्वांत पारंपरिक आणि विश्वासार्ह बचत पर्याय मानला जातो. सध्या अनेक बँका या पर्यायासोबत विनामूल्य जीवन विमा सुरक्षाही देतात. काही बँका ५० लाख रुपयांपर्यंतच्या एफडी रकमेसोबत विनामूल्य जीवन विमा संरक्षण देतात. तर, काही ठिकाणी आरोग्यसेवा देखील उपलब्ध आहेत.

आयकरातही मिळते सूट

काही बँका टॅक्स सेव्हिंग एफडीचा पर्याय देखील देतात. यावर, आयकर कायदा १९६१च्या कलम ८०सी अंतर्गत कर सवलत मिळते.

हेही वाचा-  Gold Price Today: सोने-चांदी दरात वाढ, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट

 बँक एफडीवर ओवरड्राफ्टची सुविधा

काही बँका एफडीवर ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला एफडी न मोडता रक्कम मिळवता येते.

First published:

Tags: Fixed Deposit, Money