मराठी बातम्या /बातम्या /मनी /घरबसल्या अशी करता येईल कमाई, दररोज 4 ते 5 तास काम करुन मिळेल इतकी रक्कम

घरबसल्या अशी करता येईल कमाई, दररोज 4 ते 5 तास काम करुन मिळेल इतकी रक्कम

तुमच्याकडे कॉम्प्युटर, इंटरनेट कनेक्शन (Computer and Internet Connection) असेल तर तुम्हीही घरी बसून कमाई करू शकता. त्यासाठी तुम्ही जर दरररोज 4 ते 5 तास काम केलंत तर तुम्हाला महिन्याला 15 हजार रुपये मिळू शकतात.

तुमच्याकडे कॉम्प्युटर, इंटरनेट कनेक्शन (Computer and Internet Connection) असेल तर तुम्हीही घरी बसून कमाई करू शकता. त्यासाठी तुम्ही जर दरररोज 4 ते 5 तास काम केलंत तर तुम्हाला महिन्याला 15 हजार रुपये मिळू शकतात.

तुमच्याकडे कॉम्प्युटर, इंटरनेट कनेक्शन (Computer and Internet Connection) असेल तर तुम्हीही घरी बसून कमाई करू शकता. त्यासाठी तुम्ही जर दरररोज 4 ते 5 तास काम केलंत तर तुम्हाला महिन्याला 15 हजार रुपये मिळू शकतात.

  नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : आपल्या कुटुंबासाठी, स्वत:साठी पैसे कमवणं हे महत्त्वाचं काम असतं. नोकरी, व्यवसाय करून पैसे मिळवणं हा मार्ग सगळेच अवलंबतात. कोरोना महामारीच्या काळात अचानक लॉकडाउन (Covid-19 Lockdown) झाल्यानंतर अनेकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. एवढ्या मोठ्या संकटांमध्ये अनेकांना जीवही गमवावे लागले. काही जणांची नोकरी गेली तर काहींचा पगार निम्म्यावर आला. नोकरी नसताना पर्याय उरला तो ऑनलाईन कमाईचा. तुमच्याकडे कॉम्प्युटर, इंटरनेट कनेक्शन (Computer and Internet Connection) असेल तर तुम्हीही घरी बसून कमाई करू शकता. त्यासाठी तुम्ही जर दरररोज 4 ते 5 तास काम केलंत तर तुम्हाला महिन्याला 15 हजार रुपये मिळू शकतात.

  या कामासाठी अगदी प्राथमिक गोष्टी लागतात. घरात डेस्कटॉप किंवा लॅपटॉप, Electricity, आणि तिसरं चांगलं Internet Connection असायला हवं. कॉम्प्युटर वापरण्याचं प्राथमिक ज्ञान असलं तरीही पुरेसं आहे.

  ऑनलाईन कमाई करण्याचा पहिला मार्ग म्हणजे सोशल मीडिया. सध्या Facebook, Twitter आणि Instagram हे सर्वांत लोकप्रिय डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत. इथे तुमचं प्रोफाईल असेल आणि तुम्हाला फॉलोअर्स (Social Media Followers) मिळाले तर तुमची कमाई सुरू होऊ शकते. म्हणजे तुमच्या पोस्टला लाईक, शेअर किती मिळतात याच्या संख्येवरून तुम्हाला त्या कंपन्या पैसे देतात यातून महिन्याला 15 हजार कमवता येऊ शकतात.

  2 लाख गावांपर्यंत पोहोचणार HDFC बँक, 2500 हून जास्त लोकांना मिळणार रोजगार

  दुसरा पर्याय आहे अर्ज भरून देणं आणि जाहिरातील पोस्ट करणं. अर्ज भरण्याच्या कामात काही कंपन्यांकडे रजिस्टर करावं लागतं. तिथे ते आपल्याला काही अर्ज देतात आणि त्यामध्ये डिटेल्स भरायला देतात. तुम्ही कॉम्प्युटर वापरण्याच्या प्राथमिक ज्ञानाच्या आधारे हे काम करू शकता. सगळं ऑनलाइन आहे आणि पैसेही बँक खात्यात ऑनलाईन (Online in Bank Account) जमा केले जातात. अशाच प्रकारे विविध कंपन्यांच्या क्लासिफाइड जाहिराती वेबसाइट्सवर पोस्ट करण्याचं काम असतं तुम्ही जितक्या जाहिराती पोस्ट कराल तितके अधिक पैसे तुम्हाला मिळू शकतात. या जाहिरातींच डिझाइन आणि त्या कुठे पोस्ट करायच्या हे त्या कंपनीकडून सांगितलं जातं. त्यानुसार फक्त त्या पोस्ट करायच्या असतात. यातही पैसे बँकेच्या खात्यात जमा केले जातात.

  10000 रु गुंतवून सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला होईल लाखोंची कमाई; वाचा सविस्तर

  आणखी एक चांगला पर्याय आहे YouTube Channel. व्हिडीओ तयार करून ते चॅनलवर टाकले तर तुमचे प्रेक्षक वाढत जातात आणि Monetization सुरू होतं. म्हणजे फेसबुक तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करत जातं. जर हे सुरू झालं मासिक कमाई होऊ शकते.

  First published:

  Tags: Money, Start business