• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold Price Today: सोने-चांदी दरात वाढ, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट

Gold Price Today: सोने-चांदी दरात वाढ, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट

आज सोने आणि चांदी दरात (Gold and Silver Price) वाढ झाली आहे. भारतीय बाजारात वाढीची नोंद करण्यात आली आहे. जागतिक संकेतांच्या सकारात्मक परिणामांमुळे सोने दरात वाढ झाल्याची माहिती आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी आज सोने आणि चांदी दरात (Gold and Silver Price) वाढ झाली आहे. भारतीय बाजारात वाढीची नोंद करण्यात आली आहे. जागतिक संकेतांच्या सकारात्मक परिणामांमुळे सोने दरात वाढ झाल्याची माहिती आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज MCX वर गोल्ड फ्यूचर्स रेट (Gold Rate Today) 0.33 टक्क्यांच्या वाढीसह 46,147 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. तर चांदी (Silver Rate Today) एका टक्क्याच्या वाढीसह 60,583 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. मागील सत्रात सोने दर 0.13 टक्के घसरणीसह सहा महिन्यांच्या खालील स्तरावर पोहोचला होता. तर चांदीमध्ये 1.4 टक्क्यांची घसरण झाली होती. मागील वर्ष 2020 मध्ये 56,200 रुपये रेकॉर्ड स्तरावरुन यावर्षी सोने दर जवळपास 10000 रुपयांनी स्वस्त आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षाअखेरीस सोनं रेकॉर्ड स्तरावर पोहोचू शकतं असा अंदाज आहे. त्याशिवाय देशात सणासुदीचा काळ सुरू होत असल्याने सोन्याची मागणी वाढेल. MCX वर ऑक्टोबरमध्ये सोने दरात वाढ होऊ शकते. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा दर 50000 रुपयांवर पोहचू शकतो. त्यामुळे आता सोनं खरेदीसाठी चांगली वेळ आहे.

    गुंतवणुकीसाठी व्हा सज्ज! आता ही कंपनी देखील बाजारात IPO आणण्याच्या तयारीत

    सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

    Home Loan: होम लोनविषयी जाणून घ्या सर्वकाही, घर बांधण्यासाठीही मिळतं कर्ज?

    सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.
    Published by:Karishma
    First published: