Home /News /money /

Air India 69 वर्षांनंतर अधिकृतपणे Tata Group कडे, नियोजनबद्ध निर्गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण

Air India 69 वर्षांनंतर अधिकृतपणे Tata Group कडे, नियोजनबद्ध निर्गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण

मेसर्स टॅलस प्रायव्हेट लिमिटेड ने एअर इंडियाच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी सर्वाधिक बोली लावल्यामुळे या बोलीला केंद्र सरकारने मंजूरी दिली होती. त्यानुसार, बोली जिंकणाऱ्या कंपनीला 11 ऑक्टोबर 2021 रोजी, इरादापत्र देण्यात आले होते. तसेच समभाग खरेदी करार, 25 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आला होता.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 जानेवारी : एअर इंडियाच्या धोरणात्मक नियोजनबद्ध निर्गुंतवणूक व्यवहारांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. केंद्र सरकारला, या व्यवहारातील भागीदार मेसर्स टॅलस प्रायव्हेट लिमिटेड (मेसर्स टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडची उपकंपनी) कडून 2,700 कोटी रुपयांची किंमत मिळाली आहे. तसेच, 15,300 कर्ज, एअर इंडिया आणि AIXL कडेच ठेवण्यात आले आहे. एअर इंडियाचे सर्व शेअर्स या कंपनीच्या नावे करण्यात आले आहेत. एअर इंडिया अधिकृतपणे टाटा समूहाकडे सोपवण्यापूर्वी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मेसर्स टॅलस प्रायव्हेट लिमिटेड ने एअर इंडियाच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी सर्वाधिक बोली लावल्यामुळे या बोलीला केंद्र सरकारने मंजूरी दिली होती. त्यानुसार, बोली जिंकणाऱ्या कंपनीला 11 ऑक्टोबर 2021 रोजी, इरादापत्र देण्यात आले होते. तसेच समभाग खरेदी करार, 25 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आला होता. त्यानंतर, या व्यवहारातील भागीदार, (M/s Talace Pvt Ltd) एअर इंडिया आणि केंद्र सरकारने एकत्रित बसून या व्यवहारासाठीच्या सर्व अटी शर्ती पूर्ण केल्या. यात अॅंटी ट्रस्ट बॉडीज, नियामक, कर्जदाता संस्था आणि तिसऱ्या पक्षांकडून मंजूरी मिळवण्याचाही समावेश होता. दोन्ही बाजूंच्या परस्पर सहमतीने या अटी शर्ती निश्चित करण्यात आल्या होत्या. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (Department of Investment & Public Asset Management) सचिव तुहीन कांत पांडे म्हणाले की, औपचारिकता पूर्ण झाली आहे. एअर इंडियाची निर्गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हे शेअर्स एअर इंडियाच्या नवीन मालक टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडकडे (Talace Pvt ltd) हस्तांतरित करण्यात आले आहेत. पहिल्यांदा Credit Card घ्यायचा विचार करताय? 'या' पाच क्रेडिट कार्डवरील ऑफर एकदा चेक करा 18 हजार कोटींची बोली लावून खरेदी टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की, एअर इंडियाला टाटा समूहात परत आल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे आणि ती जागतिक दर्जाची एअरलाइन बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मी हार्दिक स्वागत करतो. तोट्यात चाललेली एअर इंडिया टाटा समूहाने 18,000 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केली होती. 8 ऑक्टोबर रोजी एअर इंडिया टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडला 18,000 कोटी रुपयांना विकली गेली. हा टाटा समूहाच्या होल्डिंग कंपनीचा एक भाग आहे. एक लाख रुपये गुंतवून मिळवा 60 लाखांपर्यंतचा नफा, जाणून घ्या चंदनाच्या शेतीची संपूर्ण माहिती Air India साठी टाटा ग्रुपचा प्लान तोट्यात चाललेल्या एअर इंडियाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी टाटा ग्रुपने भविष्यातील अनेक योजना तयार केल्या आहेत. यापैकी एक म्हणजे ऑनटाइम परफॉर्मन्स म्हणजे विमानाचे दरवाजे उड्डाणाच्या वेळेच्या 10 मिनिटे आधी बंद केले जातील. विमानांच्या वेळेवर उड्डाण करण्यावर पूर्ण लक्ष असेल. याशिवाय प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवेतही वाढ करण्यात येणार आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Air india, Tata group

    पुढील बातम्या