मराठी बातम्या /बातम्या /मनी /

एक लाख रुपये गुंतवून मिळवा 60 लाखांपर्यंतचा नफा, जाणून घ्या चंदनाच्या शेतीची संपूर्ण माहिती

एक लाख रुपये गुंतवून मिळवा 60 लाखांपर्यंतचा नफा, जाणून घ्या चंदनाच्या शेतीची संपूर्ण माहिती

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

चंदनाच्या झाडांची दोन पद्धतीने लागवड करता येते, पहिली आहे ऑरगॅनिक पद्धत (organic farming) आणि दुसरी आहे पारंपरिक पद्धत.

नवी दिल्ली, 27 जानेवारी : कोरोना महामारीमुळे (Coronavirus Pandemic) अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे यादरम्यान अनेक जणांनी आपला स्वतःचा व्यवसाय (Starting own business) सुरू केला. जर तुम्हीही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याबाबत विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एक उत्तम बिझनेस आयडिया (Business idea) सांगणार आहोत. ज्यामुळे दर महिन्याला तुम्ही बंपर कमाई (earn money) करू शकाल. आज आम्ही शेतकऱ्यांच्या चंदन शेतीबद्दल (sandalwood cultivation) सांगणार आहोत.

चंदनाच्या शेतीची सर्वात चांगली गोष्ट ही आहे की, याची मागणी (sandalwood demand) आपल्या देशासोबतच परदेशातही मोठ्या प्रमाणात आहे. चंदनाच्या शेतीवर तुम्ही जितका पैसा खर्च करता त्यापेक्षा अनेक पटीने तुम्हाला नफा मिळतो. यासाठी लागणारा खर्च जवळपास 1 लाख रूपये असतो आणि यामध्ये 60 लाख रूपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो.

वाचा : भांग पडेल कोरोनावर भारी ? संशोधनातून आली 'ही' माहिती समोर

तरुण नोकरी सोडून करत आहेत हा व्यवसाय

माहितीनुसार, चंदनाच्या शेतीतून बंपर नफा मिळतो. हेच कारण आहे की, सध्या तरुणांचा कल नोकरीपेक्षा जास्त या शेतीकडे आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगड (Pratapgarh) मधील उत्कृष्ट पांडेय अधिकाऱ्याची नोकरी सोडून गावामध्ये चंदनाची शेती करून चांगली कमाई करत आहेत. एकीकडे जिथे तरुण कठोर मेहनत करून नोकरी शोधत आहेत, गावाकडची शेती सोडून नोकरी मिळवण्याची स्वप्नं पाहत आहेत तिथं हा तरुण शेतीकडे वळला आहे.

दुसरीकडे याउलट सशस्त्र सीमा दलामध्ये (SSB) असिस्टंट कमांडंटच्या पदाचा राजीनामा देऊन उत्कृष्ट पांडेय गावामध्ये चंदन-हळदीची शेती करत आहे. तर हरियाणामध्ये शेतकरी सुरेंद्र कुमार यांनी चंदनाच्या शेतीचा पहिला यशस्वी प्लांट लावला आहे. सुरेंद्र कुमार यांनी 2 एकरामध्ये चंदनाची रोपं लावली आहेत. सुरेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, चंदनाच्या शेतीसाठी प्रतिएकर जवळपास 4 लाख रुपये एवढा खर्च झाला आणि 10 वर्षानंतर प्रति एकर जवळपास 1 करोड रूपये एवढं उत्पन्न मिळत आहे.

वाचा : Income Tax च्या नव्या स्लॅबमध्ये होऊ शकतो बदल, केवळ 5 टक्के लोकांची पसंती

जाणून घ्या कशी करता येईल चंदनाची शेती

माहितीनुसार, चंदनाच्या झाडांची दोन पद्धतीने लागवड करता येते, पहिली आहे ऑरगॅनिक पद्धत (organic farming) आणि दुसरी आहे पारंपरिक पद्धत. ऑरगॅनिक पद्धतीने चंदनाची लागवड करण्यासाठी जवळपास 10 ते 15 वर्ष लागतात आणि दुसरीकडे पारंपरिक पद्धतीने 20 ते 25 वर्षं इतका वेळ लागतो. चंदनाची रोपं ही इतर रोपांच्या तुलनेत महाग मिळतात. पण जर एकत्र रोपं खरेदी केल्यास तुम्हाला सरासरी 400 रूपयांत रोप मिळेल.

भारतात चंदनाच्या लाकडाची किंमत जवळपास 8-10 हजार रुपये किलो एवढी मिळते. तर दुसरीकडे परदेशात अनेकवेळा यांची किंमत 20-25 हजार रुपये किलो एवढी मिळते. एका झाडापासून जवळपास 8-10 किलो लाकूड आरामात मिळतं. तर एका एकरामध्ये चंदनाच्या झाडापासून 50 ते 60 लाख रुपयांपर्यंत कमाई केली जाऊ शकते.

मग तुम्हीही व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर चंदनाच्या शेतीच्या पर्यायाबाबत नक्की विचार करा.

First published:

Tags: Investment, Money, Small business, Tree plantation