Home /News /money /

पहिल्यांदा Credit Card घ्यायचा विचार करताय? 'या' पाच क्रेडिट कार्डवरील ऑफर एकदा चेक करा

पहिल्यांदा Credit Card घ्यायचा विचार करताय? 'या' पाच क्रेडिट कार्डवरील ऑफर एकदा चेक करा

तुमच्यासाठी सर्वोत्तम क्रेडिट कार्ड (Best Credit Card) तुमच्या खर्चाच्या पद्धतीवर आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे फायदे मिळवायचे आहेत यावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत ही 5 एंट्री-लेव्हल क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

    मुंबई, 27 जानेवारी : देशातील मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांमध्येही क्रेडिट कार्डचा (Credit Card) कल वाढत आहे. तुम्ही तुमच्या पहिल्या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याचा विचार करत असल्यास, तुम्ही कोणते क्रेडिट कार्ड निवडावे हे समजणे कठीण आहे. तुमच्यासाठी सर्वोत्तम क्रेडिट कार्ड (Best Credit Card) तुमच्या खर्चाच्या पद्धतीवर आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे फायदे मिळवायचे आहेत यावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत ही 5 एंट्री-लेव्हल क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. Amazon Pay ICICI Bank Credit Card अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डद्वारे Amazon अॅप किंवा वेबसाइटवर खरेदीसाठी प्राइम मेंबर्ससाठी 5 टक्के आणि नॉन-प्राइम सदस्यांसाठी 3 टक्के अनलिमिटेल रिवॉर्ड पॉइंट उपलब्ध आहेत. Amazon वर, या कार्डद्वारे रिचार्ज आणि बिल पेमेंटसाठी 2 टक्के अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध आहेत. Amazon व्यतिरिक्त कुठेही पेमेंट केल्यावर 1 टक्के अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट्स दिले जातात. हे लाईफटाईम फ्री क्रेडिट कार्ड आहे. Axis ACE Credit Card अॅक्सिस ऐस क्रेडिट कार्डद्वारे Google Pay वर रिचार्ज आणि बिल पेमेंटवर 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. Swiggy, Zomato आणि Ola वर 4 टक्के कॅशबॅक आणि इतर सर्व ऑनलाइन किंवा ऑफलाइन खर्चावर 2 टक्के कॅशबॅक आहे. या कार्डची वार्षिक फी 499 रुपये आहे. एक लाख रुपये गुंतवून मिळवा 60 लाखांपर्यंतचा नफा, जाणून घ्या चंदनाच्या शेतीची संपूर्ण माहिती SBI SimplyCLICK Credit Card SBI SimplyCLICK क्रेडिट कार्ड वापरून Amazon, BookMyShow, Cleartrip, Lenskart आणि Netmeds वर 10X रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. या कार्डद्वारे इतर ऑनलाइन खर्च केल्यास 5X रिवॉर्ड पॉइंट मिळतात. या कार्डची वार्षिक फी 499 रुपये आहे. Flipkart Axis Bank Credit Card Flipkart आणि Myntra वर Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. या कार्डसह, Cleartrip, PVR, Uber, Swiggy, Cure.Fit, Tata 1mg आणि Tata Sky वर खर्च करण्यासाठी 4 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे तर इतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंटवर 1.5 टक्के अनलिमिडेट कॅशबॅक उपलब्ध आहे. या कार्डची वार्षिक फी 500 रुपये आहे. ncome Tax च्या नव्या स्लॅबमध्ये होऊ शकतो बदल, केवळ 5 टक्के लोकांची पसंती HSBC Cashback Credit card एचएसबीसी कॅशबॅक क्रेडिट कार्डद्वारे ई वॉलेट रिलोड वगळता सर्व ऑनलाईन खर्चावर 1.5 टक्के आणि इतर प्रकारच्या खर्चावर 1 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. या कार्डची वार्षिक फी 750 रुपये आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bank, Credit card, Money

    पुढील बातम्या