• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Tata Steel खरेदी करणार ही सरकारी कंपनी? वाचा काय आहे योजना

Tata Steel खरेदी करणार ही सरकारी कंपनी? वाचा काय आहे योजना

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (Rashtriya Ispat Nigam Limited) ही सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी खरेदी करण्यास टाटा स्टील ही कंपनी इच्छुक आहे, अशी माहिती टाटा स्टील (Tata Steel Company) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे

  • Share this:
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट: राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (Rashtriya Ispat Nigam Limited) ही सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी खरेदी करण्यास टाटा स्टील ही कंपनी इच्छुक आहे, अशी माहिती टाटा स्टील (Tata Steel Company) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन (T. V. Narendran) यांनी दिली. केंद्रीय पोलाद मंत्रालयांतर्गत (Central Steel Ministry) येणारी RNIL ही कंपनी आंध्र प्रदेश राज्यात विशाखापट्टणम (Vishakhapattanam) येथे असून, 73 लाख टन एवढी तिची उत्पादनक्षमता आहे. हा भारतातला किनारी भागातला पहिला एकात्मिक पोलाद उत्पादन कारखाना आहे. आर्थिक विषयांवरच्या मंत्रिमंडळ समितीने 27 जानेवारी रोजी RNIL मधून सरकारच्या पूर्ण निर्गुंतवणुकीला तत्त्वतः मंजुरी दिली होती. RNIL ला विशाखापट्टणम इस्पात संयंत्र किंवा विझाग स्टील असंही म्हटलं जातं. RNIL ही कंपनी खरेदी करण्यात टाटा स्टील कंपनीला रस असल्याबद्दल विचारलं असता टी. व्ही. नरेंद्रन यांनी होकारार्थी उत्तर दिलं. पीटीआय या वृत्तसंस्थेला नरेंद्रन यांनी सांगितलं, 'होय, टाटा स्टील कंपनीला RNIL या सरकारी कंपनीचं अधिग्रहण करण्यात रस आहे. कारण ती विकासाची एक मोठी संधी आहे. ही कंपनी पूर्व आणि दक्षिणेकडच्या किनारी भागात असल्याने त्याचे अनेक फायदे आहेत.' हे वाचा-Gold-Silver Price Today: सोन्याचांदीला झळाळी, आज सोन्याचे दर 47 हजारांपार RNIL ही कंपनी सुमारे 22 हजार एकर क्षेत्रावर पसरलेली आहे. जिथून कोकिंग कोलसारखा कच्चा माल येतो, त्या गंगावरम बंदरापर्यंत त्याची पोहोच आहे. ही कंपनी भारताच्या पूर्व किनाऱ्यावर असल्याने ती कंपनी अधिग्रहित केल्यास टाटा स्टील कंपनीला आग्नेय आशियाई बाजारपेठेत अधिक सुलभतेने पोहोचता येईल. त्यामुळे साहजिकच टाटा स्टील कंपनीची व्याप्ती आणि उलाढाल वाढण्यास मदत होणार आहे. नरेंद्रन यांनी सांगितलं, 'ओडिशातल्या (Odisha) नीलाचल इस्पात निगम लिमिटेड (Neelachal Ispat Nigam Limited) या कंपनीच्या खरेदीसाठीही टाटा स्टील कंपनी इच्छुक आहे. त्यासाठीचं 'एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट'चं (Expression of Interest) पत्रही कंपनीने सरकारकडे सादर केलं आहे.' हे वाचा-PM Kisan: लाभार्थी नसूनही घेतला आहे योजनेचा लाभ? अपात्र शेतकऱ्यांना सरकारचा दणका NINL हा संयुक्त उद्योग आहे. त्यात एमएमटीसी, राष्ट्रीय खनिज विकास निगम (NMDC), भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) आणि मेकॉन या सार्वजनिक क्षेत्रातल्या चार कंपन्या आणि IPICOL आणि ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन (OMC) या ओडिशा सरकारच्या दोन कंपन्यांची भागीदारी आहे. ओडिशातली ही कंपनीही टाटा स्टीलने घेतल्यास कंपनीचा पसारा आणखी वाढण्यात मदत होणार आहे.
First published: