मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold-Silver Price Today: सोन्याचांदीला झळाळी, आज सोन्याचे दर 47 हजारांपार

Gold-Silver Price Today: सोन्याचांदीला झळाळी, आज सोन्याचे दर 47 हजारांपार

Gold-Silver Price Today

Gold-Silver Price Today

आज देशांतर्गत बाजारात सोनेचांदीच्या दरात तेजी (Gold-Silver Price Today on 18 August) पाहायला मिळाली आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर स्थिर आहेत.

    नवी दिल्ली, 18 ऑगस्ट: आज देशांतर्गत बाजारात सोनेचांदीच्या दरात तेजी (Gold-Silver Price Today on 18 August) पाहायला मिळाली आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर स्थिर आहेत. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Multi Commodity Exchange) सोन्याची वायदे किंमत 0.2 टक्क्यांनी वाढू 47,374 रुपये प्रति तोळा झाली आहे तर चांदीच्या दरात 0.37 टक्क्यांची वाढ होऊन दर 63,462 रुपये प्रति किलोवर आहेत. या आठवड्यातील हा सोन्याचा सर्वोच्च दर आहे. आधीच्या सत्रात सोन्याचे दर स्थिर होते तर चांदीमध्ये 0.5 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. दरम्यान आज जरी सोन्याचे दर वधारले असले तरीही गेल्यावर्षीच्या रेकॉर्ड हायच्या स्तरापेक्षा दर अद्यापही जवळपास 9000 रुपयांनी कमी आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर स्थिर आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी सोन्याचे दर स्थिर आहेत. स्पॉट गोल्डची किंमत 1,785.66 डॉलर प्रति औंसवर आहे. अमेरिकन सोन्याची वायदे किंमत 1,787.20 डॉलरवर आहे. डॉलर बुधवारी युरोच्या तुलनेत नऊ महिन्याच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे. दरम्यान चांदीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात 0.1 टक्क्यांनी वाढून 23.65 डॉलर प्रति औंस झाले आहेत. हे वाचा-PM Kisan: लाभार्थी नसूनही घेतला आहे योजनेचा लाभ? अपात्र शेतकऱ्यांना सरकारचा दणका देशांतर्गत बाजारात MCX Gold ऑक्टोबरमध्ये 47,450-47,600 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. एमसीएक्सवर सप्टेंबरच्या डिलिव्हरीच्या चांदीची किंमत 63,900-64,400 रुपयांपेक्षा जास्त असू शकते. 50000 रुपयांवर पोहोचलणार सोनं तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे दर लवकरच 50000 रुपये प्रति तोळावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे. सध्या दर तुलनेने कमी असल्याने गुंतवणूकदार यात गुंतवणूक करू शकतात. आधीपासून सोन्यात गुंतवणूक करत असाल तर आता देखील होल्ड ठेवणं फायदेशीर ठरू शकेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today

    पुढील बातम्या