मराठी बातम्या /बातम्या /मनी /

अखेर TATA समूहाची झाली Air India, जेआरडींचा फोटो शेअर करत रतन टाटा म्हणाले- Welcome Back

अखेर TATA समूहाची झाली Air India, जेआरडींचा फोटो शेअर करत रतन टाटा म्हणाले- Welcome Back

Tata Sons wins bid to acquire Air India: जेआरडी टाटा यांची आठवण करून रतन टाटा यांनी असे लिहिले आहे की - जर ते आज असते तर त्यांना हा क्षण पाहून खूप आनंद झाला असता.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर: देशातील सरकारी विमान कंपनी एअर इंडिया (TATA Sons won Air India Final Bid) आता टाटा समूहाची झाली आहे. यानंतर रतन टाटा यांनी ट्वीट करत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी जेआरडी टाटा यांचा फोटो शेअर केला आणि 'वेलकम बॅक Air India' असं ट्वीट केलं आहे. टाटाने एअर इंडियासाठी 18,000 कोटींची बोली लावली होती.

या ट्वीटमध्ये त्यांनी एक नोट शेअर केली आहे. ज्यात रतन टाटा यांनी असे लिहिले आहे की- टाटा ग्रुपने एअर इंडियाची बोली जिंकल्याची बातमी खूप आनंददायक आहे. एअर इंडियाच्या पुनर्बांधणीसाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. अशी अपेक्षा आहे की यामुळे विमान क्षेत्रातील टाटा समूहाची उपस्थिती आणखी मजबूत होईल. जेआरडी टाटा यांची आठवण करून रतन टाटा यांनी असे लिहिले आहे की - जर ते आज असते तर त्यांना हा क्षण पाहून खूप आनंद झाला असता.

1932 मध्ये जेआरडी टाटांनी सुरू केली होती एअर इंडिया

एअर इंडियाची सुरुवात टाटा समूहाने 1932 मध्ये केली होती. टाटा समूहाचे जेआरडी टाटा (JRD TATA Air India) हे त्याचे संस्थापक होते. त्यावेळी या कंपनीचे नावा टाटा एअरलाइन्स होते. जेआरडी स्वतः पायलट होते. तेव्हा या कंपनीचे ना टाटा एअर सर्विस असे होते. 1938 पर्यंत कंपनीने देशांतर्गत उड्डाणे सुरू केली होती. 1946 मध्ये या विमान कंपनीचे नाव एअर इंडिया करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर ती एक सरकारी कंपनी बनली. स्वातंत्र्यानंतर 1953 साली सरकारने या कंपनीतील 49% हिस्सा विकत घेतला. 2000 सालापर्यंत ही कंपनी फायद्यामध्ये होती. 2001 सालापासून कंपनीच्या वाईट दिवसांना सुरुवात झाली होती.

हे वाचा- मोठी बातमी! 68 वर्षानंतर Air India ची 'घरवापसी', आता Ratan Tata असणार नवे मालक

एअर इंडिया ही एकमेव सरकारी मालकीची विमान कंपनी सध्या कर्जात बुडाली आहे. एअर इंडियाच्या डोक्यावर 58 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. याचा परिणाम म्हणून याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतनही वेळेवर मिळत नाही. दरम्यान आता एअर इंडियाचा मालकी हक्क टाटा सन्सकडे आल्याने बदलावाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Air india, Ratan tata, Tata group