मुंबई, 3 सप्टेंबर : टाटा समूहाची आणखी एक कंपनी आता शेअर बाजारात लिस्ट होण्याची शक्यता आहे. नाव बदलल्यानंतर टाटा प्ले झालेल्या टाटा ग्रुपच्या टाटा स्कायचा आयपीओ येणार आहे. टाटा समूहाच्या सॅटेलाइट टेलिव्हिजन बिझनेस टाटा प्लेच्या IPO साठी ड्राफ्ट पेपर या महिन्याच्या अखेरीस सेबीकडे सादर केले जाऊ शकतात. टाटा प्ले हा टाटा समूह आणि वॉल्ट डिस्ने इंडिया यांचा संयुक्त उपक्रम आहे.
IPO ची साईज किती असेल?
डायरेक्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स (DRHP) चा ड्राफ्ट या महिन्याच्या अखेरीस SEBI कडे सादर केला जाईल. IPO च्या साईजबद्दल बोलायचे तर ते 300-400 मिलियन डॉलरच्या श्रेणीत राहू शकते. लाइव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार ही बातमी समोर आली आहे.
Multibagger Share: सरकारी कंपनीच्या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल! एक लाख बनले 2.65 कोटी
जुलैमध्येच टाटा प्लेच्या IPO बाबतची बातमी समोर आली होती. डिस्नेसह अनेक गुंतवणूकदार कंपन्यांना टाटा स्कायमधील त्यांचे स्टेक विकायचे आहेत. प्रस्तावित IPO मध्ये, गुंतवणूकदार टेमासेक आणि टाटा कॅपिटल कंपनीतील त्यांच्या स्टेकचा काही भाग विकणार आहेत, जे IPO मार्गाने होऊ शकते.
2004 मध्ये, टाटा स्कायने टाटा सन्स आणि नेटवर्क डिजिटल डिस्ट्रिब्युशन सर्विसेस FZ-LLC (NDDS) यांच्यात 80:20 संयुक्त उपक्रम म्हणून काम सुरू केले. NDDS रूपर्ट मर्डोकच्या 21st Century Fox चा भाग आहे. डिस्नेने 2019 मध्ये फॉक्सचे अधिग्रहण केले, त्यानंतर डिस्नेकडे TS इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडच्या माध्यमातून टाटा स्कायमध्ये आणखी 9.8 टक्के हिस्सा आहे, तर टाटा सन्सकडे कंपनीमध्ये 41.49 टक्के हिस्सा आहे.
सप्टेंबर महिन्यात होऊ शकतं मोठं आर्थिक नुकसान, 'या' गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष
18 वर्षानंतर टाटा कंपनीचा आयपीओ
2004 नंतर टाटा समूहाकडून कोणत्याही कंपनीचा IPO आलेला नाही. म्हणजेच टाटा समूहाच्या एका कंपनीचा IPO येऊन 18 वर्षे झाली आहेत. 2004 मध्ये 18 वर्षांपूर्वी देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चा IPO आला होता. TCS ने IPO च्या माध्यमातून 5500 कोटी रुपये उभे केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market