मराठी बातम्या /बातम्या /मनी /सप्टेंबर महिन्यात होऊ शकतं मोठं आर्थिक नुकसान, 'या' गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष

सप्टेंबर महिन्यात होऊ शकतं मोठं आर्थिक नुकसान, 'या' गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष

Business Idea: ‘ही’ मशिन घेऊन रस्स्त्याच्या कडेला कुठेही बसा अन् दररोज कमवा 2000 रुपये, 10 हजारात सुरू होणार काम

Business Idea: ‘ही’ मशिन घेऊन रस्स्त्याच्या कडेला कुठेही बसा अन् दररोज कमवा 2000 रुपये, 10 हजारात सुरू होणार काम

वर्षभरात असे काही महिने असतात, जेव्हा नियमांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल घडतात. या वर्षी सप्टेंबर महिनाही खूप महत्त्वाचा आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Maharashtra, India

   मुंबई, 2 सप्टेंबर-   वर्षभरात असे काही महिने असतात, जेव्हा नियमांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल घडतात. या वर्षी सप्टेंबर महिनाही खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही आयकर भरत असाल किंवा तुमच्या दैनंदिन व्यवहारासाठी डेबिट कार्ड वापरत असाल तर हा महिना तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. या शिवाय आयकर रिटर्न आणि अटल पेन्शन योजनेशी संबंधित महत्त्वाचे बदल सप्टेंबरमध्ये होणार आहेत. या महत्त्वाच्या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. जाणून घेऊयात सविस्तर.

  रिटर्न व्हेरिफिकेशनसाठी करदात्याकडे फक्त 30 दिवस

  टॅक्स रिटर्नची पडताळणी करून, तुम्ही रिटर्न फॉर्ममध्ये दिलेली माहिती योग्य आणि पूर्ण आहे आणि ती आयकर कायदा, 1961 च्या तरतुदींनुसार आहे, याची तुम्हाला खातरजमा करावी लागते.

  1 ऑगस्ट 2022 रोजी किंवा त्यानंतर (म्हणजे 31 जुलैच्या देय तारखेनंतर) भरलेल्या कर रिटर्नच्या पडताळणीची (ITR Verification) अंतिम मुदत 120 दिवसांवरून 30 दिवसांवर आणली आहे. म्हणजेच जर तुम्ही तुमचा आयकर रिटर्न 8 ऑगस्ट रोजी भरला असेल, तर तुम्हाला 7 सप्टेंबरपूर्वी रिटर्नची पडताळणी करणं आवश्यक आहे. 30 -दिवसांची व्हेरिफिकेशन विंडो (Verification Window) तुम्ही तुमचा आयकर रिटर्न सबमिट कराल त्या दिवसापासून सुरू होते.

  31 जुलै 2022 रोजी किंवा त्यापूर्वी भरलेल्या कर रिटर्नसाठी, रिटर्नची पडताळणी करण्याची अंतिम मुदत तशीच राहते. म्हणजे कर रिटर्न भरल्याच्या तारखेपासून 120 दिवस. तुम्ही रिटर्न व्हेरिफिकेशनला जितका उशीर कराल तितका जास्त वेळ तुमच्या बँक खात्यात (Bank Account) रिटर्न जमा होण्यासाठी लागेल. तसंच, जर तुम्ही वेळेवर पडताळणी केली नाही, तर तुम्ही रिटर्न भरला नाही, असं मानलं जाईल.

  सुरक्षित व्यवहारांसाठी तुमचं कार्ड टोकनाईझ करा

  सुरक्षित व्यवहारांसाठी, तुम्हाला तुमचा क्रेडिट (Credit Card) आणि डेबिट कार्ड डाटा सप्टेंबरमध्येच बदलणं आवश्यक आहे. हा डाटा म्हणजे जो तुम्ही ऑनलाइन (Online), पॉइंट-ऑफ-सेल (POS) किंवा कोणत्याही अॅप ट्रॅन्झॅक्शनसाठी वापरता. सुरक्षित व्यवहारांसाठी तुम्हाला युनिक टोकन (Unique Token) वापरावं लागेल.

  भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आदेशानुसार, टोकनसंबंधी नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होईल. या अंतर्गत, सर्व मर्चंट वेबसाइट्सना ऑनलाइन व्यवहारांची प्रक्रिया करण्यासाठी तुमचा कार्ड क्रमांक, CVV किंवा त्यांच्या सर्व्हरवर अंतिम तारीख सेव्ह करण्यास मनाई केली जाईल. आता युजरला टोकन सेव्ह करून ठेवावं लागेल. जर व्यापारी किंवा कंपनीला पुढील पेमेंटसाठी तुमचा डेटा वापरायचा असेल तर तेच टोकन सेव्ह करून ठेवावं लागेल.

  बँका डेबिट कार्ड देण्यासाठी वाढवत आहेत फी

  सप्टेंबर महिन्यापासून अनेक बँकांनी डेबिट कार्ड सेवेसाठीचं वार्षिक शुल्क आणि कार्ड देण्यासाठीच्या फीमध्ये (Card Issue Fee) वाढ करण्याची घोषणा केली आहे. कार्ड्स आणि इतर इनपुट्समध्ये वापरल्या जाणार्‍या सेमीकंडक्टर चिप्सच्या (Semiconductor Chips) किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे ही वाढ करण्यात आली आहे.

  उदाहरणार्थ, इंडियन ओव्हरसीझ बँकेने 6 सप्टेंबरपासून प्रभावी डेबिट कार्डच्या अनेक प्रकारांसाठी शुल्क वाढवलं आहे. IOB कडून रूपे क्लासिक डेबिट कार्ड देण्यासाठी 50 रुपये शुल्क आकारण्यात येत होते आणि दुसऱ्या वर्षापासून वार्षिक शुल्क 150 रुपये होते. परंतु आता कार्ड इश्यु करण्यासाठी 150 रुपये आणि वार्षिक शुल्क 250 रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

  अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची संधी

  18-40 वयोगटातील लोकांसाठी, 30 सप्टेंबर 2022 हा अटल पेन्शन योजनेसाठी नावनोंदणी करण्याचा शेवटचा दिवस आहे. पेन्शन योजना असंघटित कामगारांना दरमहा 1,000 रुपये ते 5,000 रुपये किमान हमी पेन्शन सेवा पुरवते. ही योजना 2015 मध्ये कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी स्वावलंबन योजना म्हणून सुरू करण्यात आली होती.

  या बरोबरच राष्ट्रीय प्रणालीमध्ये काही शुल्कांतही वाढ करण्यात आली आहे. या महिन्यानंतर, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत काही चार्जेस वाढणार आहेत.हे काही महत्त्वाचे बदल या महिन्यात होणार आहेत. यामध्ये डेबिट कार्डसाठी फी आणि वार्षिक शुल्क वाढवण्यासह, आयकर रिटर्न आणि अटल पेन्शन योजनेशी संबंधित महत्त्वाचे बदल आहेत.

  First published:

  Tags: Money, September