मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Multibagger Share: सरकारी कंपनीच्या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल! एक लाख बनले 2.65 कोटी

Multibagger Share: सरकारी कंपनीच्या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल! एक लाख बनले 2.65 कोटी

'या' शेअर्सनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; पुढे काय होणार? वाचा तज्ज्ञांचं मत

'या' शेअर्सनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; पुढे काय होणार? वाचा तज्ज्ञांचं मत

Multibagger Share: एक लाख रुपये गुंतवून गुंतवणूकदाराला BPCL चे 6,667 शेअर्स मिळाले असते. BPCL चे हे 6,667 शेअर्स आता 2000 च्या बोनस शेअरसह 8000 पर्यंत वाढले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 3 सप्टेंबर : शेअर बाजारात गुंतवणूक करणे जोखीमीचं मानलं जातं. गुंतवणूकदारांनी अल्प मुदतीवर अधिक लक्ष केंद्रित केल्यास नुकसान होण्याचा धोका असतो. दीर्घकालीन गुंतवणूक नेहमीच चांगला परतावा देते. असाच एक शेअर आहे ज्याने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. 23 वर्षांपूर्वी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमधील 1 लाख रुपयांची गुंतवणूक आज 2.65 कोटी बनली असती.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने डिसेंबर 2000 पासून चार वेळा बोनस शेअर्स जाहीर केले आहेत. गेल्या 23 वर्षांत बीपीसीएलने डिसेंबर 2000, जुलै 2012, जुलै 2016 आणि जुलै 2017 मध्ये गुंतवणूकदारांना एक्स-बोनस शेअर्सचे व्यवहार केले आहेत. पहिल्या तीन प्रसंगी, कंपनीने 1:1 बोनस शेअर्सची घोषणा केली, तर 2017 मध्ये कंपनीने 1:2 बोनस शेअर्सची घोषणा केली.

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दररोज भरा 95 रुपये अन् मिळवा 14 लाख; काय आहे योजना?

बोनस शेअर्समधून गुंतवणूकदारांना नफा

जर एखाद्या गुंतवणूकदाराने ऑगस्ट 2000 च्या सुरुवातीला बीपीसीएलमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर त्या वेळी कंपनीच्या शेअरची किंमत 15 रुपये प्रति शेअर होती. त्यावेळी 1 लाख रुपये गुंतवून गुंतवणूकदाराला BPCL चे 6,667 शेअर्स मिळाले असते. BPCL चे हे 6,667 शेअर्स आता 2000 च्या बोनस शेअरसह 8000 पर्यंत वाढले.

सप्टेंबर महिन्यात होऊ शकतं मोठं आर्थिक नुकसान, 'या' गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष

BPCL च्या शेअरची किंमत NSE वर सध्या 331.80 च्या आसपास आहे. त्यानुसार, या स्टॉकमध्ये दीर्घ मुदतीसाठी 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची एकूण संपत्ती सुमारे 2.65 कोटी रुपये झाली असती. गेल्या 23 वर्षांत शेअरची किंमत 15 रुपयांवरून 331.80 रुपयांपर्यंत वाढली आहे. 1 लाखाच्या गुंतवणुकीवर परतावा 22.12 लाख असता पण जर बोनस शेअर्स जोडले तर ते 2.65 कोटी रुपये झाले असते.

First published:

Tags: Investment, Money, Share market