मराठी बातम्या /बातम्या /मनी /Multibagger Stock : 'या' स्टॉकने गुंतवणूकदारांचे 10,000 चे केले एक कोटी! तज्ज्ञांच्या मते अजूनही कमाईची संधी

Multibagger Stock : 'या' स्टॉकने गुंतवणूकदारांचे 10,000 चे केले एक कोटी! तज्ज्ञांच्या मते अजूनही कमाईची संधी

गेल्या 6 महिन्यांत आयशर मोटर्सचा स्टॉक सुमारे 11 टक्क्यांच्या वाढीसह 2447.25 रुपयांवरून 2712 रुपयांपर्यंत वाढला आहे. तसेच हा ऑटो स्टॉक गेल्या एका वर्षात सुमारे 24 टक्क्यांनी वाढला आहे.

मुंबई, 9 नोव्हेंबर : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी (Share Market Investment) संयम हा एक मोठा गुण मानला जातो. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, केवळ खरेदी-विक्री करून पैसा कमावला जात नाही, तर संयमाने गुंतवणूक करून पैसा कमावला जातो. दर्जेदार स्टॉक (Quality Stock) विकत घेऊन त्यात दीर्घकाळ संयम ठेवून राहिल्याने पैसे मिळतात. दीर्घकालीन गुंतवणूक (Long Term Investment) केवळ तुमची जोखीम कमी करत नाही तर तुमचा नफा देखील वाढवते.

आयशर मोटर्सचे (Eicher Moters) शेअर्स खरेदी करा, होल्ड करा आणि विसरुन जा, या रणनितीचं उत्तम उदाहरण आहे. गेल्या 20 वर्षांत आयशर मोटर्सच्या शेअरची किंमत 2.43 रुपयांवरून 2712 रुपयांपर्यंत वाढली आहे. दोन दशकात या स्टॉकमध्ये 1116 पट वाढ झाली आहे.

आयशर मोटर्सची शेअर प्राईज हिस्ट्री

गेल्या 6 महिन्यांत आयशर मोटर्सचा स्टॉक सुमारे 11 टक्क्यांच्या वाढीसह 2447.25 रुपयांवरून 2712 रुपयांपर्यंत वाढला आहे. तसेच हा ऑटो स्टॉक गेल्या एका वर्षात सुमारे 24 टक्क्यांनी वाढला आहे.

या शेअरने दिला 240 टक्क्यांपेक्षा अधिक बंपर रिटर्न! ₹1,091 वर पोहचू शकतो स्टॉक

गेल्या 1 वर्षात हा शेअर 2192.85 रुपयांवरून 2712 रुपये प्रति शेअर झाला आहे. गेल्या दीड वर्षात जवळपास 115 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. एप्रिल 2020 पासून आत्तापर्यंत हा शेअर 1268 रुपयांवरून 2712 रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या 10 वर्षात हा स्टॉक 174 रुपयांवरून 2712 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत 15.60 पटीने झेप घेतली आहे. तसेच गेल्या 20 वर्षात हा स्टॉक 2.43 रुपयांवरून 2712 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत या स्टॉकमध्ये 1116 पट वाढ झाली आहे.

आता या शेअरचा प्रवास बघितला तर 6 महिन्यांपूर्वी गुंतवलेले 10,000 रुपये आज 11,100 रुपये झाले असतील. दुसरीकडे, जर एखाद्याने 1 वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 10,000 रुपये गुंतवले असते, तर ते आज 12,400 रुपये झाले असते. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने एप्रिल 2020 च्या सुरुवातीला 10,000 रुपये गुंतवले असते, तर हे 10,000 रुपये आज 21,500 रुपये झाले असते. त्याचप्रमाणे, 10 वर्षांपूर्वी जर कोणी या स्टॉकमध्ये 10,000 रुपये गुंतवले असते, तर आज ते 10,000 रुपये 1.56 लाख झाले असते. दुसरीकडे, या शेअरमध्ये 20 वर्षांपूर्वी कोणी 10,000 रुपये गुंतवले असते आणि तो आजपर्यंत त्यात राहिला असता, तर हे 10,000 रुपये आज 1.116 कोटी रुपये झाले असते.

खूशखबर! Bank of Baroda विकतेय स्वस्त प्रॉपर्टी, वाचा कधी होणार मेगा ई-लिलाव?

या शेअरमध्ये गुंतवणुकीची रणनिती काय असावी

शेअर बाजारातील दिग्गजांचा अजूनही या शेअरमध्ये खरेदीचा सल्ला आहे. चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बगाडिया सांगतात की, या स्टॉकने 2712 रुपयांच्या स्तरावर क्लोजिंग आधारावर नवीन फ्रेश ब्रेकआउट दिला आहे आणि लवकरच हा स्टॉक अल्पावधीत 2900 ते 3000 च्या लेव्हलला टच करू शकतो. सध्याच्या लेव्हलवरही हा स्टॉक 2600 च्या स्टॉप लॉसने खरेदी करता येईल.

First published:
top videos

    Tags: Investment, Money, Share market