नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : जर तुम्ही नवा उद्योग, व्यवसाय (Business) सुरू करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला अशी एक बिझनेस आयडिया देत आहोत की या उद्योग, व्यवसायातून तुम्ही दररोज 4 हजार रुपये अगदी सहजपणे कमवू शकाल. विशेष म्हणजे या व्यवसायासाठी कोणतंही खास प्रशिक्षण (Training) घेण्याची गरज नाही. या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही दरमहा 1,20,000 रुपये अगदी सहजपणे कमवू शकता. कॉर्न फ्लेक्स (Corn Flakes) निर्मितीचा हा व्यवसाय असून, या माध्यमातून तुम्ही महिनाभरात लखपती बनू शकता.
कॉर्न फ्लेक्सचा व्यवसाय करा
सर्वांना मक्याविषयी (Corn) माहिती आहे. दररोज मक्याचा वापर अनेक घरांत सकाळी नाष्ट्यावेळी केला जातो. आरोग्यासाठी देखील मका फायदेशीर मानला जातो. त्यामुळे जाणून घेऊया या अनोख्या व्यवसायाविषयी सविस्तर...
व्यवसायासाठी जागा किती लागेल?
हा व्यवसाय सुरू करण्याकरिता प्रकल्प उभारणीसाठी तुमच्याकडे जमीन असणं गरजेचं आहे. याशिवाय स्टोरेज आणि गोदामासाठी देखील पुरेशी जागा आवश्यक आहे. एकूण विचार केला तर या व्यवसायाकरिता तुमच्याकडे 2000 ते 3000 स्क्वेअर फूट जागा हवी. या व्यवसायासाठी आवश्यक बाबींचा विचार केला तर तुम्हाला मशिनरी, विजेची सुविधा, जीएसटी क्रमांक, कच्चा माल, स्टॉक ठेवण्यासाठी गोदामाची गरज आहे.
व्यवसाय कुठे करावा?
या व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या मशिनरी किंवा यंत्रांचा वापर हा केवळ मक्यापासून तयार करण्यात येणाऱ्या कॉर्न फ्लेक्ससाठी होतो असं नाही तर गहू, ज्वारीपासून फ्लेक्स (Flakes) तयार करण्यासाठी करता येऊ शकतो. ज्या भागात मका पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं, त्या भागात तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. जर तुम्ही कॉर्न फ्लेक्स तयार करण्यासाठी दूर ठिकाणांहून मका आणायचं म्हटलं तर त्यासाठी ज्यादा खर्च येऊ शकतो. त्यामुळे ज्या भागात पुरेसा मका उपलब्ध आहे किंवा तुम्हाला स्वत:ला ज्या ठिकाणी मका उत्पादन घेणं शक्य आहे, अशा ठिकाणी व्यवसायाची उभारणी करावी.
किती फायदा होईल?
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एक किलो कॉर्न फ्लेक्स तयार करण्यासाठी किमान 30 रुपये खर्च येतो. हे कॉर्न फ्लेक्स बाजारात 70 रुपये किलो दरानं अगदी सहजपणे विक्री होऊ शकतात. जर तुम्ही दररोज 100 किलो कॉर्न फ्लेक्सची बाजारात (Market) विक्री केली तर तुम्हाला 4 हजार रुपये फायदा होऊ शकतो. अगदी महिन्याचा विचार केला तर तुमचे उत्पन्न 1,20,000 रुपये होतं.
या शेअरने दिला 240 टक्क्यांपेक्षा अधिक बंपर रिटर्न! ₹1,091 वर पोहचू शकतो स्टॉक
व्यवसायासाठी किती गुंतवणूक करावी लागेल?
जर गुंतवणूकीचा (Investment) विचार केला तर ही गोष्ट तुमच्या व्यवसायाच्या आकारामानावर अवलंबून आहे. मात्र सुरवातीच्या काळात या व्यवसायासाठी किमान 5 ते 8 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business, Investment, Money