जाहिरात
मराठी बातम्या / मनी / दु:खद बातमी! रतन टाटा यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन

दु:खद बातमी! रतन टाटा यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन

रतन टाटा यांच्या निकटवर्तियांचं निधन

रतन टाटा यांच्या निकटवर्तियांचं निधन

टाटा समूहातील दिग्गज आणि टाटा सन्सचे माजी संचालक आर. के. कृष्णकुमार यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : टाटा कुटुंबासाठी आणि टाटा समूहात काम करणाऱ्यांच्या मनाला चटका लावणारी बातमी आहे. रतन टाटा यांच्या जवळच्या आणि विश्वासू व्यक्तीचं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. टाटा समूहातील दिग्गज आणि टाटा सन्सचे माजी संचालक आर. के. कृष्णकुमार यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 84 व्या वर्षी मुंबईत त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. टाटा सन्समध्ये 66 % हिस्सा असलेल्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे ते विश्वस्तही होते. कृष्णकुमार यांचं सायंकाळी सहा वाजता राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Ratan Tata : कोणत्याही उद्योजकानं रतन टाटांकडून शिकाव्या अशा 4 गोष्टी

CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार 3 जानेवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत आर. के. कृष्णकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात असल्याची माहिती टाटा समूहाच्या अधिकाऱ्यांनी दिली. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निकटवर्तीय मानले जायचे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले, “आर. कृष्णकुमार हे रतन टाटांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जायचे, त्यांनी आपलं आयुष्य केवळ टाटाग्रूपसाठी वाहून घेतलं. त्यांचं टाटा ग्रूपसाठी खूप मोठं योगदान आहे.”

Ratan Tata unknown Facts : आई-वडील नाही तर ‘या’ खास व्यक्तीनंं सांभळलं रतन टाटांना

एन चंद्रशेखर पुढे म्हणाले की, “त्यांना नेहमी मदत करायला आवडायची. ते एक अनुभवी लीडर होते. अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडाव्यात यासाठी ते त्यांच्या परीने नेहमी प्रयत्न करत राहिले. त्यांच्या जाण्याने न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आम्हाला त्यांची खूप आठवण येईल.” कृष्णकुमार यांनी टाटा ग्रूपमध्ये मोठं योगदान दिलं. त्यांनी चहाला देखील जगात दुसऱ्या क्रमांकावर आणलं. त्यानंतर ते 2013 पर्यंत ते इंडियन हॉटेल्सचे उपाध्यक्षही होते. 2009 मध्ये केंद्र सरकारने कुमार यांना पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांच्या उद्योगातील योगदानाबद्दल सन्मानित केले.

Ratan Tata Birthday : रतन टाटांचे ते गोल्डन रूल्स, ज्यांच्या आधारे उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय
News18लोकमत
News18लोकमत

कृष्णकुमार यांनी 1963 रोजी चेन्नईतील प्रेसिडेन्सी कॉलेज सोडले आणि टाटा समूहात प्रवेश घेतला. त्यांची पहिली पोस्टिंग टाटा इंडस्ट्रीजमध्ये झाली होती आणि तिथून त्यांनी टाटा ग्लोबल बेव्हरेजेस, इंडियन हॉटेल्स आणि टाटा सन्स या टाटाच्या अनेक संस्थांबरोबर काम केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात