जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Accenture ला मागे टाकत, TCS ठरली जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी

Accenture ला मागे टाकत, TCS ठरली जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी

Accenture ला मागे टाकत, TCS ठरली जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी

टाटा ग्रुपची फ्लॅगशिप फर्म टाटा कंसल्टेंसी सर्विसेज (TCS) जगातील सर्वाधिक वॅल्यू असणारी सॉफ्टवेअर कंपनी ठरली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 जानेवारी : टाटा ग्रुपची फ्लॅगशिप फर्म टाटा कंसल्टेंसी सर्विसेज (TCS) जगातील सर्वाधिक वॅल्यू असणारी सॉफ्टवेअर कंपनी ठरली आहे. TCS ने सोमवारी Accenture ला मागे टाकत हे स्थान पटकावलं आहे. टीसीएसने मार्केट कॅप (TCS Market Cap) 169.9 अरब डॉलर (जवळपास 12,43,540.29 कोटी रुपये) पार केलं आहे. 2018 मध्ये IBM या मार्केटमध्ये अव्वल कंपनी होती. त्यावेळी IBM चा एकूण रेवेन्यू टीसीएसच्या तुलनेत जवळपास 300 टक्के अधिक होता. त्यानंतर दुसऱ्या स्थानी एक्सेंचरचं नाव होतं. दरम्यान गेल्या वर्षी एप्रिलमध्ये टीसीएसचं मार्केट 100 अब्ज डॉलरवर पोहचलं.

(वाचा -  Driving Licence काढण्याच्या नियमांमध्ये बदल; केवळ याच पद्धतीने अर्ज करता येणार )

8 जानेवारी 2021 रोजी TCS ने आपल्या तिसऱ्या तिमाहीचे रिझल्ट घोषित केले होते. तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीची कामगिरी जबरदस्त झाली होती. त्यानंतर त्यांच्या शेअरमध्येही मोठी वाढ झाली. गेल्या तिमाहीमध्ये कंपनीचा कंसोलिडेटेड नफा 8,433 कोटी रुपये होता. मागील 9 वर्षात 2021 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीची सर्वाधिक ग्रोथ पाहायला मिळाली. यावेळी बोलताना कंपनीच्या CEO नी, कंपनीची मार्केट पोझिशन आतापर्यंतच्या सर्वात मजबूत स्थितीमध्ये असल्याचं सांगितलं. याचाच परिणाम कंपनीच्या शेअर्सवर पाहायला मिळाला.

(वाचा -  कोरोना वॅक्सिनच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीपासून सावधान; आधार-OTP शेअर करू नका )

बीएसईवर (BES) टीसीएस शेअर 0.28 टक्क्यांच्या वाढीसह 3,312.70 रुपयांवर ट्रेड करत आहे. तर NSE वर TCS शेअर 0.36 टक्क्यांच्या वाढीसह 3,315 रुपयांवर ट्रेड करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात