Home /News /money /

सांभाळून करा खर्च; कोरोना काळात आर्थिक नियोजनसाठी या सूत्रांचा करा वापर

सांभाळून करा खर्च; कोरोना काळात आर्थिक नियोजनसाठी या सूत्रांचा करा वापर

कोरोना स्थितीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून, उद्योग-धंदे ठप्प आहेत. त्यामुळे अनेकांना अर्थिक अडचणींचा तसेच वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे.

    नवी दिल्ली, 16 मे : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे (Corona)गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या संसर्गामुळे सरकारने लॉकडाऊन (Lockdown)तसेच कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा रोजगार अडचणीत आला आहे. कोरोना स्थितीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून, उद्योग-धंदे ठप्प आहेत. त्यामुळे अनेकांना अर्थिक अडचणींचा तसेच वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. अनेक जण आपल्या गुंतवणूकीच्या आधारे दैनंदिन गरजा भागवत आहे. येत्या काळात जर ही स्थिती लवकरात लवकर सुधारली नाही, तर अर्थिक चणचण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अशातच कोरोनामुळे अचानक वैद्यकीय खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उपलब्ध पैशांचे काटेकोर नियोजन (Economical Planning)गरजेचं आहे. हे नियोजन कसं करावं याबाबतची काही सूत्र तज्ज्ञांनी सांगितली आहेत. काय आहेत ही सूत्र जाणून घेऊया... आरोग्य विमा गरजेचा कर सल्लागार गौरी चढ्ढा यांनी अमर उजालाशी बोलताना सांगितले की सध्याच्या काळात आरोग्य विमा (Health Policy)हा अत्यंत गरजेचा आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या परिवारातील कोणाही व्यक्तीला तातडीने वैद्यकिय उपचारांची गरज भासली तर विम्याच्या माध्यमातून ही अडचण सहज सुटू शकते. परंतु हा विमा घेताना तुम्हाला अनेक गोष्टींचा बारकाईने विचार करावा लागेल. जीवन विमा घेताना पारंपारिक योजनांची निवड करावी. कारण यात प्रिमियम कमी आणि सुरक्षा कवच अधिक मिळते. जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीबाबत दुर्घटना घटना घडली तर परिवारातील सर्व व्यक्तींना अर्थिक सुरक्षा मिळू शकते. हे ही वाचा-LIC ची ही योजना देते महिना 9000, उत्पन्न वाढवण्यासाठी कशी करायची गुंतवणूक? अनावश्यक कर्ज,पर्सनल लोन घेणं टाळा गौरी चढ्ढा यांनी सांगितलं की कोरोना काळात अनावश्यक गोष्टींवरील खर्च थांबवणे गरजेचे आहे. ऑनलाईन शॉपिंग,सुट्ट्यांमध्ये फिरायला जाणं यासारख्या गोष्टी टाळल्या तर थोडीफार बचत होऊ शकते. ही बचत आपल्याला भविष्यात निश्चितच फायदेशीर ठरु शकते. या काळात जर तुम्ही अनावश्यक कर्ज (Loan)घेतलं तर तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकून राहू शकता. आज अनेक लोक आपल्या क्रेडिट कार्डची बिलं किंवा कर्जाचे हप्ते भरु शकत नसल्याचे वास्तव आहे. यामुळे क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊन व्याज वाढते. त्यामुळे भविष्यातील अर्थिक समस्या टाळण्यासाठी अनावश्यक कर्ज घेणं टाळा. अनेक ठिकाणी करा गुंतवणूक कर सल्लागार गौरी चढ्ढा यांनी सांगितलं की कधीही संपूर्ण पैसे एकाच ठिकाणी गुंतवू नयेत. गुंतवणूकी दरम्यान पोर्टफोलियोमध्ये(Portfolio)वैविध्य ठेवा. कारण जिथे आपण पैसे गुंतवले आहेत तेथे दिलेल्या वेळेत तेवढे परतावे देणे आवश्यक नसते. त्यामुळे काही पैसे इक्विटी तसेच अन्य फंडांमध्ये गुंतवणे आवश्यक आहे. डेट फंडात पैसे सुरक्षिततेची खात्री मिळेल तर इक्विटी फंडात (Equity Fund)गुंतवणूक केल्याने चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांना द्या गुंतवणूकीची माहिती इंदौरच्या सीए शाखेच्या अध्यक्षा किर्ती जोशी यांनी सांगितले की तुम्ही ज्याठिकाणी आणखी जितकी गुंतवणूक केली आहे,त्याची माहिती जोडीदाराला आणि कुटुंबातील सदस्यांना देणं गरजेचं आहे. सर्व पॉलिसींची एक यादी तयार करुन ठेवावी. याचे नॉमिनी (Nominee)कोण-कोण व्यक्ती आहेत याचाही त्या यादीत उल्लेख असावा. वेळोवेळी नॉमिनी अपडेट करावे. तसेच योग्यवेळी मृत्यूपत्र देखील तयार करुन ठेवावे. म्हणजे भविष्यात कोणालाच कसलीही अडचण येणार नाही. खर्चासाठी एक बजेट तयार करा किर्ती जोशी यांनी सांगितले की आपल्या कुटुंबाची अर्थिक स्थिती विचारात घेऊन एक बजेट तयार करावे. आवश्यक खर्चांसाठी वेगळे बजेट (Budget)सेट करा. सर्व प्रकारची कर्ज,बिले आणि फीस साठी वेगळे बजेट आखावे. महिना अखेरीला वास्तविक खर्च आणि बजेटची तुलना करावी. यामुळे तुम्हाला किती योग्य आणि किती वायफळ खर्च करता हे समजेल. तसेच यामुळे तुम्ही अनावश्यक खर्च टाळू शकला आणि योग्य बचत साध्य होईल. हे ही वाचा-PF अकाऊंटमध्ये किती आहे बॅलन्स? जाणून घ्यायची ही आहे सोपी पद्धत सहा महिन्यांचा इमरजन्सी फंड तयार करा कर सल्लागार गौरी चढ्ढा यांनी सांगितले की अर्थिक संकट टाळण्यासाठी आपल्या मासिक खर्चासह अन्य खर्चाकरीता किमान सहा महिन्यांसाठी इमर्जन्सी फंड (Emergency Fund)तयार करा. जर आपली नोकरी गेली आणि परत नवी नोकरी मिळण्याची शक्यता लवकर नाही,असे ज्यांना वाटते त्यांनी किमान 1 वर्षांचा इमरजन्सी फंड तयार करावा. यासाठी यामधील 50 टक्के रक्कम बॅंकेतील सेव्हिंग खात्यात तर 50 टक्के रक्कम म्युचअल फंड किंवा लिक्विड फंडात ठेवावी. या फंडाचा उपयोग आपत्कालीन वेळी होऊ शकतो.
    First published:

    Tags: Corona virus in india, Investment, Lockdown, Savings and investments

    पुढील बातम्या