मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PF अकाऊंटमध्ये किती आहे बॅलन्स? जाणून घ्यायची ही आहे सोपी पद्धत

PF अकाऊंटमध्ये किती आहे बॅलन्स? जाणून घ्यायची ही आहे सोपी पद्धत

 EPFO ने एक क्रमांक जारी केला असून त्यावर मिस्ड कॉल केला असता हा बॅलन्स समजू शकतो.

EPFO ने एक क्रमांक जारी केला असून त्यावर मिस्ड कॉल केला असता हा बॅलन्स समजू शकतो.

EPFO ने एक क्रमांक जारी केला असून त्यावर मिस्ड कॉल केला असता हा बॅलन्स समजू शकतो.

नवी दिल्ली, 15 मे: कोरोना काळात (Coronavirus) जर तुम्हाला पैशांची गरज भासत असेल तर तुम्ही प्रोव्हिडंट फंडामधून (PF) पैसे काढू शकता. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अनेक लोक आपल्या पीएफ अकाऊंटमधून (PF Account)पैसे काढत आहेत. परंतु,ज्यांना पीएफ अकाऊंटविषयी काहीही माहिती नाही,असेही अनेक लोक आहेत. नोकरी करीत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यास आणि कंपनीला पीएफची रक्कम ईपीएफओ (EPFO)मध्ये जमा करावी लागते. प्रत्येक महिन्याला पगारातून कापली जाणारी रक्कम अनेक कर्मचारी निवृत्त झाल्यावर परत मिळवतात. परंतु,नोकरी बदलताना किंवा ईपीएफची रक्कम ट्रान्सफर करताना आपल्या खात्यात किती रक्कम आहे, हे बऱ्याच लोकांना ठाऊक नसते.

नुकतेच 1 एप्रिल 2021 रोजी नवे अर्थिक वर्ष सुरु झाले आहे. या वर्षासाठी अनेक बाबींमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आपण आपला पीएफ बॅलन्स नेमका किती आहे हे तपासू शकतो. हा बॅलन्स तपासण्याचे अनेक मार्ग आहेत. यापैकीच एक म्हणजे ईपीएफओने एक क्रमांक जारी केला असून त्यावर मिस्ड कॉल केला असता हा बॅलन्स समजू शकतो. या व्यतिरिक्त एसएमएस व्दारेही बॅलन्सबाबत माहिती मिळू शकते.

मिस्ड कॉलसाठी हा क्रमांक डायल करा

तुम्ही एका मिस्ड कॉलवर (Missed Call)आपला पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला पीएफ अकाऊंटसाठी रजिस्टर मोबाईल क्रमांकावरुन 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल,त्यात तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा असलेल्या रकमेची माहिती मिळेल. या मेसेजमध्ये पीएफ क्रमांक,नाव,जन्मतारीख,ईपीएफ बॅलन्स तसेच अखेरीस जमा केलेली रक्कम याची माहिती दिली जाते.

एसएमएसव्दारेही तपासू शकता पीएफ बॅलन्स

एसएमएसव्दारे (SMS)पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांकावरुन तुम्हाला 7738299899 या क्रमांकावर मेसेज करावा लागेल. या मेसेजमध्ये बॅलन्स तपासण्यासाठी तुम्हालाEPFOHO UAN ENGअसे टाईप करुन हा मेसेज 7738299899वर पाठवावा लागेल.ENGया शब्दांचा अर्थ असा की ज्या भाषेत तुम्हाला माहिती हवी आहे. ही मेसेजची सुविधा तुम्हाला इंग्रजी,हिंदी,गुजराथी,पंजाबी,कन्नड,तेलगु,मल्याळम आणि बंगाली भाषेतून मिळू शकते. वेगवेगळ्या भाषांसाठी कोडही वेगवेगळे आहे,कोणते ते पाहूया..

1)इंग्रजीसाठी कोणताही कोड नाही. 2) हिंदी –HIN,3)पंजाबी –PUN,4) गुजराती –GUJ,5) मराठी –MAR,6) कन्नड –KAN,7) तेलुगु –TEL,8) तामिळ –TAM,9) मल्याळम –MAL,10)बंगाली –BEN.

उमंगअॅपव्दारेतपासू शकता बॅलन्स

ईपीएफओचे सभासद उमंग अॅपच्या माध्यमातूनही मोबाईल फोनवर आपला पीएफ बॅलन्स तपासू शकतात.UMANG APPहे सरकारने लॉन्च केलेले आहे. या अपच्या मदतीनं तुम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांची माहिती एकावेळी मिळवू शकता. या अपच्या मदतीने तुम्ही ईपीएफओ पासबुक बघण्यासोबतच क्लेम देखील करु शकता. तसेच केलेला क्लेम (Claim)अॅपव्दारे ट्रॅकही करु शकता. हे अप सुरु करण्यासाठी आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमाकांव्दारे रजिस्ट्रेशन करावे लागेल.

1 एप्रिलपासून पीएफच्या व्याजावरील कर विषयक नियम बदलले

कर्मचारी भविष्य निधी म्हणजेच ईपीएफ (EPF)आणि वॉलेंटरी प्रोव्हिडंट फंडात (VPF)एका अर्थिक वर्षामध्ये एखाद्याकर्मचाऱ्यानेजर अडीच लाखांहून जास्त रक्कम जमा केली असेल तर अडीच लाखांहून अधिक रकमेवरील व्याज करपात्र असेल. आता अडीच लाखांपर्यंतची गुंतवणूक अर्थिक वर्षात करमुक्त होईल. खासगी क्षेत्रातील कर्मचारी अडीच लाखांपर्यंत आणि सरकारी कर्मचाऱ्यांना5लाखांपर्यंत करमुक्त गुंतवणूक करताय येणार आहे.

First published:

Tags: Epfo news, PF Amount