LIC ची ही योजना देते महिना 9000, उत्पन्न वाढवण्यासाठी कशी करायची गुंतवणूक?

LIC ची ही योजना देते महिना 9000, उत्पन्न वाढवण्यासाठी कशी करायची गुंतवणूक?

LIC: काही कारणामुळे हातात अचानक मोठी रक्कम आली असेल, तर ती एकरकमी या योजनेत गुंतवून नंतर दर महिन्याला पेन्शन स्वरूपात पैसे मिळवण्याचा मार्ग हा आहे.

  • Share this:

मुंबई, 15 मे: एलआयसी (LIC) अर्थात जीवन विमा निगमच्या (Life Insurance Corporation) काही योजना गुंतवणूकदारांच्या दृष्टीने फायदेशीर आहेत. जीवन शांती (Jeevan Shanti) या योजनेद्वारे दर महिन्याला पेन्शन मिळण्याचा पर्यायअसतो. त्यामुळे काही कारणामुळे हातात अचानक मोठी रक्कम आली असेल, तर ती एकरकमी या योजनेत गुंतवून नंतर दर महिन्याला पेन्शन स्वरूपात पैसे मिळवण्याचा मार्ग या योजनेमुळे उपलब्ध झाला आहे.'टीव्ही नाइन हिंदी'नेयाबद्दलचं वृत्त दिलं आहे.

जीवन शांती हा नॉन लिंक्ड (Non-Linked)प्लॅन आहे. त्या योजनेत एकरकमी (Single Premium)पैसे भरायचे असतात आणि दरमहिन्याला पेन्शन मिळवण्याचा पर्याय उपलब्ध असतो. इमिजिएट अॅन्युइटी(Immediate Annuity)हा पर्याय निवडला,तर तातडीने पेन्शन सुरू करता येतं.डेफर्ड अॅन्युइटी (Deferred Annuity)हा पर्याय निवडला तर काही वर्षांनीपेन्शन सुरू करता येतं.

प्रत्यक्ष सोनं विकत घेणं चांगलं की डिजीटल gold, ETF? त्यावर कसा आकारला जातो कर?

तरुण वयात ज्या व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करतअसतील,त्यांच्यासाठी डेफर्ड अॅन्युइटी हा पर्याय चांगला आहे. त्यांनानिवृत्तीनंतर या योजनेतून पेन्शन मिळत राहतं.30वर्षांपासून ते85वर्षांपर्यंतच्या वयाच्या व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतात. यापॉलिसीवर कर्जही घेता येतं. तसंच,ही पॉलिसी घेतल्यानंतर आपल्याला त्यातलेकाही मुद्दे पटले नाहीत किंवा अन्य काही अडचण असेल,तर तीन महिन्यांनी हीपॉलिसी सरेंडरही करता येते.

कोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा,हे आहे कारण;पाहा लोनसाठीचे इतर पर्याय

30ते35वर्षं वयाच्या व्यक्तीनेएकरकमी पाच लाख रुपये या योजनेत गुंतवले आणि डेफर्ड अॅन्युइटी यापर्यायानुसार20वर्षांनी पेन्शन मिळवण्याचा पर्याय निवडला,तर21.6टक्केव्याजदराने त्याला पेन्शन मिळेल. दर वर्षी मिळणारं व्याज साधारणपणे1.05लाख रुपये असेल. ही रक्कम मासिक स्वरूपात स्वीकारायचं ठरवलं,तर महिन्यालासाधारणपणे नऊ हजार रुपये मिळतील. हे पेन्शन आजीवन म्हणजेच संबंधित व्यक्तीमरेपर्यंत मिळत राहतं.

एक तर पैसे गुंतवल्या गुंतवल्या लगेचचपेन्शन मिळवण्याचा पर्याय स्वीकारता येतो. थोड्या कालावधीनंतर पेन्शन हवंअसेल,तर पाच, 10, 15किंवा20वर्षांनंतर पेन्शन सुरू करण्याचा पर्यायउपलब्ध असतो.

एलआयसीच्या पूर्वीच्या जीवन अक्षय (Jeevan Akshay)या योजनेसारखीच ही जीवन शांती पॉलिसी आहे. ही पॉलिसी ऑनलाइन(Online)किंवा ऑफलाइन (Offline)खरेदी करणं शक्य आहे. ही व्यापक योजनाअसून,त्यात संबंधित व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबालाही (Family Cover)लाभमिळतो.

First published: May 15, 2021, 7:53 AM IST
Tags:

ताज्या बातम्या