मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पेनी स्टॉकचा धमाका! 2 रुपयांचा स्टॉक 74 रुपयांवर, सहा महिन्यात 1 लाख बनले 34 लाख

पेनी स्टॉकचा धमाका! 2 रुपयांचा स्टॉक 74 रुपयांवर, सहा महिन्यात 1 लाख बनले 34 लाख

सूरज इंडस्ट्रीजच्या शेअरने गेल्या सहा महिन्यांत त्यांच्या शेअर होल्डर्सना 3,378 टक्के परतावा दिला आहे. हा पेनी स्टॉक 2 जून 2021 रोजी 2.14 रुपयांवर होता, जो गुरुवारी BSE वर 74.45 रुपयांच्या ऑल टाईम हायवर पोहोचला.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 3 डिसेंबर : शेअर बाजारात गुंतवणूक (Stock Market Investors) करणे जितके फायदेशीर आहे तितकीच जोखीमीचेही आहे. मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना कमी वेळेत श्रीमंत केले आहे. जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पेनी स्टॉकमध्ये (Penny stock) गुंतवणूक करू शकता. आजकाल अनेक मल्टीबॅगर पेनी स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. पेनी स्टॉक हे असे स्टॉक (what is Penny stock) असतात जे खूप स्वस्त आहेत आणि ज्यांचे बाजार मूल्य कमी असते. सूरज इंडस्ट्रीजच्या (Suraj Industries) स्टॉकही असाच एक स्टॉक आहे ज्याने गुंतवणूकदारांना कमी वेळेत मालामाल केले.

6 महिन्यांत 2 रुपयांचा स्टॉक 74 रुपयांवर पोहोचला

सूरज इंडस्ट्रीजच्या शेअरने गेल्या सहा महिन्यांत त्यांच्या शेअर होल्डर्सना 3,378 टक्के परतावा दिला आहे. हा पेनी स्टॉक 2 जून 2021 रोजी 2.14 रुपयांवर होता, जो गुरुवारी BSE वर 74.45 रुपयांच्या ऑल टाईम हायवर पोहोचला.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सहज उपलब्ध होणार कर्ज, SBI ची Adani Capital शी हातमिळवणी

गेल्या 21 ट्रेडिंग सत्रांमध्ये स्टॉक 175.2 टक्के वाढला आहे. गुरुवारी, सूरज इंडस्ट्रीजचा शेअर बीएसईवर 4.93 टक्क्यांच्या वाढीसह 74.45 रुपयांवर उघडला. सूरज इंडस्ट्रीज कंपनीची मार्केट कॅप 64.40 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. 7 डिसेंबर 2020 रोजी, मायक्रोकॅप शेअर 1.29 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.

Paytm ला पहिल्यांदा एखाद्या ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईज किती?

1 लाख बनले 34 लाख

सूरज इंडस्ट्रीजच्या स्टॉकमध्ये सहा महिन्यांपूर्वी गुंतवलेले 1 लाख रुपये आज 34.78 लाख रुपये झाले असते. त्या तुलनेत या काळात सेन्सेक्स 12.5 टक्क्यांनी वधारला आहे. सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत, कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 0.08 कोटी रुपयांच्या तोट्याच्या तुलनेत 0.82 कोटी रुपयांचा नफा कमावला.

सूरज इंडस्ट्रीजचा स्टॉक 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे. एका महिन्यात स्टॉक 162 टक्क्यांनी वाढला आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market