मुंबई, 3 डिसेंबर : पेटीएम आयपीओमध्ये (Paytm IPO) गुंतवणूक केलेल्या अनेकांना आजही पश्चाताप होतोय. कारण त्यांची पेटीएमचा शेअर अजूनही लिस्टिंग प्राईजपासून (Paytm Listing Price) बराच दूर आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे त्यात अडकले आहेत. पेटीएमच्या शेअरमध्ये लिस्टिंगनंतरही मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यानंतर काही सुधारणा शेअरमध्ये झाली मात्र अजूनही शेअर लिस्टिंग प्राईजपासून 550 रुपये प्रति शेअर मागे आहे. अशा पेटीएमने गुंतवणूकदारांना निराश केलं होतं. मात्र आता प्रथमच ब्रोकरेज फर्मकडून पेटीएमला 'BUY' रेटिंग मिळाले आहे.
Paytm ची मूळ कंपनी One97 Communications च्या शेअर्सची लिस्टिंग गेल्या महिन्यात शेअर बाजारात खूपच कमकुवत होती आणि तेव्हापासून त्याच्या शेअर्समध्ये सतत चढ-उतार होत आहेत. मात्र आता पेटीएमला ब्रोकरेज फर्म Dolat Capital Market Private Ltd ने 'बाय' रेटिंग दिले आहे.
एका अहवालानुसार, Dolat Capital Market ही तिसरी ब्रोकरेज फर्म आहे जिने Paytm चे शेअर्स कव्हर करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी, दोन ब्रोकरेज फर्म्स - Macquarie आणि JM Financial यांनी पेटीएम शेअर्स कव्हर करण्यास सुरुवात केली होती. या दोन्ही कंपन्यांनी स्टॉकला अनुक्रमे 'अंडर परफॉर्म' आणि 'सेल' रेटिंग दिली होती.
Mamata Banerjee: मुंबई दौऱ्यावर असलेल्या ममता बॅनर्जींचा थेट राहुल गांधींवर हल्ला, म्हणाल्या...
डोलाट कॅपिटल मार्केटच्या मते, पेटीएमचे एजंट ते आर्थिक सेवांचे "निर्माता" बनणे, सेवांची क्रॉस-सेलिंग आणि यूजर्सच्या संख्येत मजबूत वाढ यामुळे कंपनीला मदत होईल. ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की पेटीएमचे 'सुपर अॅप' आता लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे असा विश्वास आहे. हे भारतीय इंटरनेट उद्योगातील सर्वात मजबूत डिजिटल ब्रँड्सपैकी एक आहे. इंटरनेट बेस अर्थव्यवस्थेत आपले स्थान निर्माण केले आहे.
Dolat Capital Market ने सांगितले की आम्हाला Paytm चा महसूल पुढील दशकात वार्षिक 40 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे आणि 2026 पर्यंत ते नफ्यात असेल अशी आमची अपेक्षा आहे. Dolat Capital Markets ने Paytm च्या स्टॉकसाठी 2,500 रुपयांचे टार्गेट दिले आहे, जी त्याच्या इश्यू किमतीपेक्षा 16 टक्के जास्त आहे.
Aaditya Thackeray आणि Mamata Banerjee यांची भेट गुप्त का ठेवली? काही कटकारस्थान आहे का? भाजपचे सवाल
पेटीएमचे शेअर्स 18 नोव्हेंबरला शेअर बाजारात 9 टक्क्यांच्या घसरणीसह लिस्ट झाले होते. पेटीएमची इश्यू किंमत 2,150 रुपये होती. Paytm चा IPO हा देशातील आजपर्यंतचा सर्वात मोठा IPO आहे. अलीकडच्या काळात काही इतर स्टार्टअप्सच्या तुलनेत आयपीओला गुंतवणूकदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. गुरुवारी, पेटीएमचे शेअर्स NSE वर 2.42 टक्क्यांनी घसरून 1,597.10 रुपये प्रति शेअरवर बंद झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Paytm