मराठी बातम्या /बातम्या /मनी /शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सहज उपलब्ध होणार कर्ज, SBI ची Adani Capital शी हातमिळवणी

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सहज उपलब्ध होणार कर्ज, SBI ची Adani Capital शी हातमिळवणी

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) देशातील शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी अदानी कॅपिटलशी (Adani capital) हातमिळवणी केली आहे. अलीकडेच, SBI ने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी कर्ज देण्यासाठी अदानी समूहाची NBFC शाखा अदानी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड सोबत करार केला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 3 डिसेंबर : शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक दिलासादायक बातमी आहे. आता शेतकऱ्यांना कर्ज (Farmer Loan) मिळणे सोपे होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीची आणि इतर कामे खोळंबणार नाहीत आणि कर्जासाठी वारंवार बँकाच्या पायऱ्याही झिजवाव्या लागणार नाहीत. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) देशातील शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी अदानी कॅपिटलशी (Adani capital) हातमिळवणी केली आहे. अलीकडेच, SBI ने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी कर्ज देण्यासाठी अदानी समूहाची NBFC शाखा अदानी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड सोबत करार केला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया NBFC च्या सहकार्याने कर्ज देईल. बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या भागीदारीमुळे एसबीआय पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी यंत्रे खरेदी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकेल. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी SBI अनेक NBFCs सोबत सहकार्य करून कर्ज देण्याची प्रक्रिया वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

Paytm ला पहिल्यांदा एखाद्या ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईज किती?

भागीदारीचा फायदा काय होईल?

एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, सह-कर्ज कार्यक्रमांतर्गत (SBI-Adani Capital co-lending) अदानी कॅपिटलसोबत हातमिळवणी करताना आम्हाला आनंद होत आहे. या भागीदारीमुळे SBI च्या ग्राहकांची संख्या वाढेल. यासह, देशाच्या कृषी क्षेत्राशी जोडण्यास मदत होईल आणि भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेच्या विकासात योगदान देईल. यापुढे, आम्ही दुर्गम भागातील जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि शेवटच्या टप्प्यातील बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी अधिक NBFC सह जवळून काम करत राहू.”

First published:

Tags: Farmer, SBI