Success Story : एका 'आयडिया' मुळे बनले करोडपती,10 श्रीमंत लोकांमध्ये पोहोचले सहाव्या स्थानावर

Success Story : एका 'आयडिया' मुळे बनले करोडपती,10 श्रीमंत लोकांमध्ये पोहोचले सहाव्या स्थानावर

D-Mart चे संस्थापक राधाकिशन दमानी रिटेल बिझनेसचे किंग मानले जातात. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात शेअर बाजारातल्या गुंतवणुकीने केली पण एका कल्पनेने त्यांचं आयुष्य बदललं.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : D-Mart चे संस्थापक राधाकिशन दमानी (Radhakishan Damani Success Story)रिटेल बिझनेसचे किंग मानले जातात. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात शेअर बाजारातल्या गुंतवणुकीने केली पण एका कल्पनेने त्यांचं आयुष्य बदललं. अवघ्या 24 तासांत त्यांची संपत्ती 100 पटीने वाढली.

D-Mart चालवणारी कंपनी अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्टची मार्केट कॅप सोमवारी दीड लाख कोटींच्या पार पोहोचली. सुपरमार्केट 'डीमार्ट' चा मालकी हक्क अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्टकडे आहे. ही कंपनी देशातली 18 वी मौल्यवान कंपनी बनली आहे. या कंपनीची मार्केटकॅप नेस्ले आणि बजाज फिनसर्व्हपेक्षाही जास्त आहे.

1980 मध्ये राधाकिशन दमानी यांनी शेअर बाजारात एक गुंतवणूकदार म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी D-Mart च्या IPO ची घोषणा केली. 20 मार्च 2017 पर्यंत राधाकिशन दमानी फक्त एका रिटेल कंपनीचे मालक होते पण 21 मार्चच्या सकाळी त्यांच्या कंपनीच्या शेअरचं ट्रेडिंग BSE मध्ये सुरू झालं तेव्हाच त्यांची संपत्ती 100 पटीने वाढली.

(हेही वाचा : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, आज 5 महिन्यातील सर्वात कमी दर)

21 मार्च 2017 ला शेअर बाजारात लिस्ट झालेल्या अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्टचं बाजार मूल्य 39 हजार 988 कोटी रुपये होतं. त्यानंतर या शेअरने 290 पटीने मजल मारलीय.

डीमार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांना शेअर बाजारमधला मोठा खेळाडू मानलं जातं. रमेश दमानी यांनी सुरुवातीला बॉल-बेअरिंगमध्ये बिझनेस सुरू केला पण तिथे झालेन्या नुकसानामुळे त्यांनी हा बिझनेस बंद केला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी भावासोबत स्टॉक मार्केट ट्रेडिंग सुरू केलं.त्यानंतर चांगल्या संधीच्या शोधात त्यांनी छोट्या कंपनीमध्ये गुंतवणूक सुरू केली.

(हेही वाचा : कोरोना व्हायरसमुळे राजमाच्या किंमतीत वाढ, काय आहे संबंध?)

1990 मध्ये त्यांनी गुंतवणुकीतून कोट्यवधी रुपये कमवले होते. त्यानंतर ते रिटेल बिझनेसमध्ये उतरले. आज त्यांच्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू सुमारे 1.13 लाख कोटी रुपये आहे. एवढं यश मिळूनही राधाकिशन दमानी यांची राहणी अत्यंत साधी आहे. शेअर बाजारातले दिग्गज गुंतवणूकदार त्यांना मिस्टर व्हाइट अँड व्हाइट नावाने ओळखतात. हेच मिस्टर व्हाइट अँड व्हाइट 10 श्रीमंत लोकांमध्ये सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत.

==============================================================================================

First published: February 12, 2020, 2:16 PM IST

ताज्या बातम्या