कोरोना व्हायरसमुळे राजमाच्या किंमतीत वाढ, काय आहे संबंध?

कोरोना व्हायरसमुळे राजमाच्या किंमतीत वाढ, काय आहे संबंध?

कोरोना व्हायरसमुळे गेल्या 10 दिवसात राजमाच्या किंमतीत वाढ झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरातील अनेक देशांना विळखा घातलाय. व्हायरसमुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे (corona virus) चीनमध्ये (China) 1 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. केवळ कोरोनामुळे होणारे मृत्यू ही एकमेव चिंतेची बाब नसून कोरोनाचा परिणाम देशांमधील इतर घटकांवरही होताना दिसत आहे. चीनमधील व्यापारावरही या व्हायरसचा परिणाम होताना दिसत आहे.

चीनससोबत अनेक देशांच व्यापारी संबंध आहेत. त्यातीलच एक म्हणजे भारत देश. आपण अनेक वस्तू चीनकडून आयात करतो आणि काही वस्तू चीनला विकतो सुद्धा. मात्र या कोरोना व्हायरसचा भारत आणि चीनमधील व्यापारी संबंधांवर परिणाम होताना दिसत आहे. आयात निर्यातीवर होणाऱ्या परिणामामुळे भारतामध्ये चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किंमती वाढत असल्याचं चित्र आहे.

गेल्या 10 दिवसात राजमाच्या किंमतीत वाढ

चीनमध्ये पसरत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे गेल्या 10 वर्षात राजमाच्या किंमतीत वाढ झाली आहे. भारतात गेल्या 10 दिवसात 8 टक्क्यांनी राजमाची किंमत वाढली आहे. सध्याच्या स्थितीत याचा फारसा परिणाम होताना दिसत नसला तरी येणाऱ्या काळात जर चीनमधील परिस्थिती अजून बिकट झाली तर वस्तूंच्या आयातीवर याचा आणखी परिणाम होताना दिसून येण्याची शक्यता आहे.

भारत जवळपास 50 टक्के राजमाची आयात चीनमधून करतो. राजमा हा चीनमधून आयात होणारा महत्वाचा खाद्यपदार्थ आहे. गेल्या 10 दिवसात ग्लोबल मार्केटमध्ये राजमाची किंमत 1100 डॉलर प्रति टन इतकी झाली आहे.

चीनमधील डालियान पोर्टवर आयात निर्यातीचं काम बंद पडलं आहे. शटडाऊनमुळे चीनमधून भारतात येणारे राजमाचे 300 कंटेनर बंदरांवरच आहेत. या कंटेनरमध्ये जवळपास 24 टन राजमा आहे. जवळपास पुढच्या महिन्याभरातही ही आयात होणं शक्य नसल्याचं सांगितलं जात आहे.

आपण रोजचं खातोय राजमा

भारतात दरदिवशी 8 कंटेनर राजमा येत असतो. यातील 6 कंटेनर हे चीनमधून येत असताता. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मुंबईतील घाऊक बाजारात राजमा 80 ते 81 प्रतिकिलो भावाने विकला जातोय. तर दिल्लीतील घाऊक बाजारात 83 ते 84 प्रतिकिलो भावाने विकला जात आहे. जर अशाचप्रकारे चीनमधून आयात करण्यास अडचणी येत राहिल्या तर राजमाच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

अन्य बातम्या

Coronavirus : जगाला 'कोरोना'चा इशारा देणाऱ्या डॉक्टरचाच व्हायरसनं घेतला बळी

PNB च्या नावात खरंच बदल झालाय का? बँकेकडून सोशल मीडियावर स्पष्टीकरण

पंतप्रधान मोदी आम्हाला ‘कोरोना’पासून वाचवा! जपानच्या क्रुझवर अडकलेल्या भारतीयांच

First published: February 11, 2020, 6:10 PM IST

ताज्या बातम्या