मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Diwali Picks: 'शेअरखान'चे टॉप पिक्स, दिवाळीनंतर होऊ शकते बंपर कमाई

Diwali Picks: 'शेअरखान'चे टॉप पिक्स, दिवाळीनंतर होऊ शकते बंपर कमाई

 ब्रोकिंग फर्म शेअरखान (sharekhan brokerage) अजूनही इक्विटी मार्केटमध्ये सकारात्मक आहे. प्रत्येक घसरणीत चांगल्या शेअर्सची खरेदी केली पाहिजे, असा त्यांचा विश्वास आहे.

ब्रोकिंग फर्म शेअरखान (sharekhan brokerage) अजूनही इक्विटी मार्केटमध्ये सकारात्मक आहे. प्रत्येक घसरणीत चांगल्या शेअर्सची खरेदी केली पाहिजे, असा त्यांचा विश्वास आहे.

ब्रोकिंग फर्म शेअरखान (sharekhan brokerage) अजूनही इक्विटी मार्केटमध्ये सकारात्मक आहे. प्रत्येक घसरणीत चांगल्या शेअर्सची खरेदी केली पाहिजे, असा त्यांचा विश्वास आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 26 ऑक्टोबर : यंदाचं वर्ष गुंतवणूकदारांसाठी (Share Market Investers) नफ्याचं ठरलं. अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले. पण आता गुंतवणूकदारांसाठी काही नजीकच्या काळातील आव्हानेही दिसत आहेत. यामध्ये वाढत्या एनर्जी आणि कमोडिटीच्या किमती आणि बाजारातील वाढत्या वॅल्यूएशनच्या चिंतेचा समावेश आहे. पण ब्रोकिंग फर्म शेअरखान (sharekhan brokerage) अजूनही इक्विटी मार्केटमध्ये सकारात्मक आहे. प्रत्येक घसरणीत चांगल्या शेअर्सची खरेदी केली पाहिजे, असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळेचे शेअरखानने काही शेअर्सबद्दल प्रेडिक्शन केलं आहे.

APL Apollo Tubes

कंपनीचा आऊटलूक, मजबूत बॅलेन्स शीट आणि चांगला बिझनेस मॉडेल पाहता, शेअरखान या शेअरवर खूप बुलिश आहे. परंतु त्याच्याशी संबंधित काही धोके देखील आहेत. बांधकाम आणि पायाभूत प्रकल्पांच्या मागणीनुसार, स्टीलच्या किमती वाढल्याने त्याच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो. शिवाय वाढलेल्या स्पर्धेचा त्याच्या वॉल्युमवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Bajaj Finance Q2 Result : बजाज फायनान्सच्या निव्वळ नफ्यात 53 टक्क्यांनी वाढ

Balrampur Chini Mills

साखर उद्योगातील घसरत चाललेल्या कौशल्याचा मोठा फायदा कंपनीला मिळणार आहे. याशिवाय, कंपनीच्या कमाईमध्ये डिस्टिलरीजचे मोठे योगदानामुळे मार्जिन सुधारेल आणि आर्थिक वर्ष 2021-24 या कालावधीत नफ्यात 19 टक्के वार्षिक वाढ होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या डेव्हिडंड पेआउटमध्येही पुढे वाढ होऊ शकते.

Divis Laboratories

आर्थिक वर्ष 2021-23 दरम्यान, कंपनीची वार्षिक विक्री आणि नफा या आधारावर अनुक्रमे 24 टक्के आणि 30 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

ICICI Bank

पुढे बँकेच्या रिटेल, सीव्ही आणि वैयक्तिक कर्ज व्यवसायात तेजी दिसू शकते. याशिवाय, त्याच्या कॉर्पोरेट विभागात चांगली लेन ग्रोथ दिसून येते. जी या स्टॉकवर दिसेल.

ISGEC Heavy Engineering

कंपनीची ऑर्डर बुक खूप मजबूत आहे. त्यामुळे कंपनीची कमाई पुढेही मजबूत राहील अशी अपेक्षा आहे. खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रांतून गुंतवणूक वाढवण्याचा फायदा कंपनीला मिळेल.

Top Gainer & looser : सेंसेक्समध्ये 383 अंकाची वाढ, TATA चे शेअर्स 4 टक्क्यांनी वधारले

ITC

FY22 मध्ये कंपनीच्या सिगारेटचे प्रमाण वार्षिक 12-13 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. मोबिलिटीत सुधार आणि जीएसटी बैठकीत सिगारेटवर जीएसटी लागू न झाल्याने कंपनीला फायदा होईल.

Larsen & Toubro

कंपनीच्या व्यवस्थापनाला कंपनीच्या वाढीबद्दल विश्वास आहे. रेव्हेन्यू आणि ऑर्डर फ्लो या दोन्हींच्या वाढीवर कंपनीचे लक्ष आहे. कोरोनाची दुसरी लाट असूनही कंपनीची ऑर्डर बुक 8.96 लाख कोटी रुपयांच्या मजबूत पातळीवर आहे.

या शेअर व्यतिरिक्त, शेअरखानच्या आवडत्या निवडींमध्ये LIC Housing Finance, NOCIL, PVR, Radico Khaitan, State Bank of India, Tata Elxsi, Tata Motors DVR आणि Titan Company यांचा समावेश आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market