मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Bajaj Finance Q2 Result : बजाज फायनान्सच्या निव्वळ नफ्यात 53 टक्क्यांनी वाढ

Bajaj Finance Q2 Result : बजाज फायनान्सच्या निव्वळ नफ्यात 53 टक्क्यांनी वाढ

बजाज फायनान्स कंपनीचा नेट प्रॉफिट (Bajaj Finance net profit) 53.48 टक्क्यांनी वाढून 1,480.99 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचं नेट प्रॉफिट 964.88 कोटी रुपये होते.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 26 ऑक्टोबर : बजाज फायनान्स कंपनीचा Q2 चा (Bajaj Finance Q2 result) निकाल समोर आला आहे. बजाज फायनान्स कंपनीचा नेट प्रॉफिट (Bajaj Finance net profit) 53.48 टक्क्यांनी वाढून 1,480.99 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचं नेट प्रॉफिट 964.88 कोटी रुपये होते. म्हणजेच गेल्या  वर्षीच्या तुलनेत कंपनीचा नफा जवळपास 500 कोटींहून अधिक वाढला आहे. जुलै-सप्टेंबर दरम्यान कंपनीचे नेट इंटरेस्ट इनकम (Net Intrest Income) 28 टक्क्यांनी वाढून सुमारे 5,335 कोटी रुपये झाले आहे.

बजाज फायनान्स कंपनीने सांगितले की, दुसऱ्या तिमाहीत कोरोनाशी संबंधित अडचणी आणि राइट-ऑफ पॉलिसीमुळे, थकबाकीच्या मूळ रकमेवर सुमारे 355 कोटी रुपये राइट ऑफ करण्यात आले. दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी ग्रॉस नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स (Non Performing Assets) 2.45 टक्के होती. जून तिमाही अखेर हा आकडा 2.96 टक्के होता.

Top Gainer & looser : सेंसेक्समध्ये 383 अंकाची वाढ, TATA चे शेअर्स 4 टक्क्यांनी वधारले

जुलै ते सप्टेंबर या कालावधीत बजाज फायनान्स कंपनीने 63.3 लाख नवीन कर्जे बुक केली. गेल्या वर्षी याच तिमाहीत ही संख्या 36.2 लाख होती. सप्टेंबरअखेर कंपनीची कस्टमर फ्रँचायझी 5.28 कोटी रुपये होती. हा आकडा गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत सुमारे 20 टक्क्यांनी अधिक आहे.

LIC Policy : 1302 रुपये भरुन मिळवा 27.60 लाख रुपये, वाचा पॉलिसीबद्दल संपूर्ण माहिती

बजाज फायनान्सचा अॅसेट अंडर मॅनेजमेंट (Asset Under Managment) 22 टक्क्यांनी वाढून 1,66,937 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ते 1,37,090 कोटी रुपये होते. कोरोनाच्या काळात अडचणींचा सामना करूनही कंपनीच्या व्यवसायावर फारसा परिणाम झालेला नाही आणि तो वेगाने वाढत आहे.

First published:

Tags: Bajaj finance, Investment, Share market