• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Top Gainer & looser : सेंसेक्समध्ये 383 अंकाची वाढ, TATA चे शेअर्स 4 टक्क्यांनी वधारले

Top Gainer & looser : सेंसेक्समध्ये 383 अंकाची वाढ, TATA चे शेअर्स 4 टक्क्यांनी वधारले

Sensex 383.21 अंकांच्या म्हणजेच 0.63 टक्क्यांच्या वाढीसह 61,350.26 वर बंद झाला. तर Nifty 143 अंकांच्या किंवा 0.79 टक्क्यांच्या वाढीसह 18,268.40 अंकावर बंद झाला.

 • Share this:
  मुंबई, 26 ऑक्टोबर : आज दिवसभराच्या ट्रेडनंतर शेअर बाजारात चांगली वाढ दिसल. सेन्सेक्स 383.21 अंकांच्या म्हणजेच 0.63 टक्क्यांच्या वाढीसह 61,350.26 वर बंद झाला. तर निफ्टी 143 अंकांच्या किंवा 0.79 टक्क्यांच्या वाढीसह 18,268.40 अंकावर बंद झाला. बँक निफ्टीबद्दल बोलायचे तर, आजच्या ट्रेडनंतर 45.90 अंकांनी किंवा 0.11 टक्क्यांनी वाढला होता, त्यानंतर तो 41,238 च्या लेव्हलवर बंद झाला. टाटाचे शेअर्स तेजीत सेन्सेक्सच्या टॉप-30 शेअर्समध्ये आज टाटा स्टॉक्सच्या (Tata Stocks) शेअर्समध्ये वाढ झाली. टाटा स्टील 3.9 टक्क्यांच्या वाढीसह 1345 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय टायटनही 3.20 टक्क्यांच्या वाढीसह 2456 च्या पातळीवर बंद झाला आहे. टाटा मोटर्स 5.99 टक्क्यांच्या वाढीसर 508.65 अंकांवर बंद झाला. तर टाटा मोटर्स डीव्हीआचे शेअर्स 9.95 टक्क्यांच्या वाढीसह 266.95 अंकावर बंद झाला. Top Gainer शेअर्स नेस्ले इंडिया (Nestle India), बजाज फायनान्स (Bajaj Finance), टेक महिंद्रा (Tech Mahindra), कोटक बँक (Kotak Bank), रिलायन्स (Reliance), एशियन पेंट्स (Asian Paints), आयटीसी (ITC), बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv), एसबीआय (SBI), बजाज ऑटो (Bajaj Auto), भारती एअरटेल (Bharti Airtel), एलटी (L&T), एचडीएफसी (HDFC), मारुती (Maruti), एम अँड एम (M&M), एचसीएल टेक (HCL Tech) आणि सन (SUN) यांचा समावेश टॉप गेनर्स शेअरमध्ये आहे. फार्माचे शेअर्सही वाढीसह बंद झाले आहेत. LIC Policy : 1302 रुपये भरुन मिळवा 27.60 लाख रुपये, वाचा पॉलिसीबद्दल संपूर्ण माहिती कोणत्या स्टॉकमध्ये घसरण झाली? Top Looser शेअर्सबद्दल बोलायचे तर इंडसइंड बँकेत (Indusind Bank) आज सर्वात मोठी घसरण झाली आहे. इंडसइंड बँकेचा स्टॉक 1.92 टक्क्यांनी घसरून 1154 वर बंद झाला. याशिवाय आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), एचयूएल (HUL), पॉवर ग्रिड (PowerGrid), डॉ रेड्डी (Dr Reddy), अॅक्सिस बँक (Axis Bank), टीसीएस (TCS), एचडीएफसी बँक (HDFC Bank), इन्फोसिस (Infosys) आणि एनटीपीसीच्या (NTPC) शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. Arihant Superstructures : वर्षभरात 700 टक्के रिटर्न्स, 20 रुपयांचा स्टॉक 161 रुपयांवर स्मॉलकॅप आणि मिडकॅप इंडेक्स स्मॉलकॅप आणि मिडकॅप इंडेक्सवरही खरेदी सुरू होती. स्मॉलकॅप इंडेक्स 612.72 अंकांच्या वाढीसह बंद झाला. तर मिडकॅप इंडेक्स 440.11 अंकांनी बंद झाला, सीएनएक्स मिडकॅप इंडेक्स 548 अंकांवर बंद झाला.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: