Home /News /money /

शेअर बाजारात सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण, मात्र 'हे' शेअर्स 58 टक्क्यांपर्यंत वधारले

शेअर बाजारात सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण, मात्र 'हे' शेअर्स 58 टक्क्यांपर्यंत वधारले

BSE सेन्सेक्स 28 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात 1,836.95 अंकांनी (3.11 टक्के) घसरला. निफ्टी 50 देखील 515 ने (2.92 टक्के) घसरला. मात्र तो अद्याप 17,000 च्या खाली गेलेले नाही. सर्वात मोठी घसरण निफ्टीच्या आयटी निर्देशांकात झाली.

  मुंबई, 29 जानेवारी : सलग दुसऱ्या आठवड्यात शेअर बाजारात प्रॉफिट बुकींग झाली. परिणामी प्रमुख निर्देशांक आणखी 3 टक्क्यांनी घसरले. अस्थिरता पाहता गुंतवणूकदार सावध होऊ लागले आहेत. अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने आपले चलनविषयक धोरण कडक करण्याचे संकेत दिले आहेत. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 90 डॉलरवर पोहोचले आहेत. दुसरीकडे, रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे शेअर बाजारांची चिंता वाढत आहे. त्यामुळे शेअर बाजारांवर दबाव आहे. BSE सेन्सेक्स 28 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात 1,836.95 अंकांनी (3.11 टक्के) घसरला. निफ्टी 50 देखील 515 ने (2.92 टक्के) घसरला. मात्र तो अद्याप 17,000 च्या खाली गेलेले नाही. सर्वात मोठी घसरण निफ्टीच्या आयटी निर्देशांकात झाली. तो जवळपास 6 टक्क्यांपर्यंत घसरला. निफ्टी रियल्टी निर्देशांकही 5 टक्क्यांनी घसरला. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक 7 टक्क्यांनी वधारला. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक आणि मिडकॅप निर्देशांकही 3 टक्क्यांनी घसरले. पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा दरमहा 1411 रुपये आणि मिळवा 35 लाख रुपये विशेष म्हणजे बाजार दबावाखाली असूनही 9 स्मॉलकॅप शेअर्समध्ये वाढ झाली. यामध्ये शारदा क्रॉपकेम, ओरिएंट बेल, पीएसपी प्रोजेक्ट्स, खेतान केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स, गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, एमएमटीसी आणि टीव्ही18 ब्रॉडकास्ट यांचा समावेश होता.
  • शारदा क्रॉपकेम (Sharda Cropchem) - 58 टक्के
  • ओरिएंट बेल (Orient Bell) - 20.42 टक्के
  • PSP प्रकल्प (PSP Projects) - 13.94 टक्के
  • खेतान केमिकल्स आणि फर्टिलायझर्स (Khaitan Chemicals and Fertilizers) - 13.83 टक्के
  • गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स (Gujarat Ambuja Exports)- 12.96 टक्के
  • गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (Gujarat Mineral Development Corporation) - 12.89 टक्के
  • एमएमटीसी (MMTC) - 12 टक्के
  • TV18 ब्रॉडकास्ट (TV 18 Broadcast) - 11.42 टक्के
  येत्या 1 फेब्रुवारीपासून काही नियम बदलणार, तुमच्यावर काय परिणाम होणार? चेक करा तर 43 शेअर 10-23 टक्क्यांनी घसरले. यामध्ये लक्स इंडस्ट्रीज, इंडियामार्ट इंटरमेश, टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र), विकास लाइफकेअर, उर्जा ग्लोबल, महिंद्रा लॉजिस्टिक्स, कीर्ती इंडस्ट्रीज (इंडिया), एपीएल अपोलो ट्यूब्स आणि बटरफ्लाय गांधीमथी अप्लायन्सेस यांचा समावेश आहे. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे रिसर्च हेड विनोद नायर म्हणाले की, फेडरल रिझर्व्हने आपले धोरण सांगितले आहे. ते आपला बाँड खरेदी प्रोग्राम थांबवणार आहे. मार्चमध्ये व्याजदर वाढवण्याचे संकेतही दिले आहेत. 5paisa.com चे लीड रिसर्च रुचित जैन म्हणाले की, निफ्टीचा अलीकडील 18,350 अंकांचा उच्चांक लक्षात घेता, ही बाजारातील एक सामान्य करेक्शन होती. आता फेडरल रिझर्व्हची योजना समोर आली आहे, तर बाजाराचा कल 2022 च्या अर्थसंकल्पावर अवलंबून असेल. अर्थसंकल्प शॉर्ट टर्ममध्ये शेअर बाजाराला दिशा देईल अशी अपेक्षा आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published:

  Tags: Investment, Money, Share market

  पुढील बातम्या