Home /News /money /

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा दरमहा 1411 रुपये आणि मिळवा 35 लाख रुपये

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा दरमहा 1411 रुपये आणि मिळवा 35 लाख रुपये

Post office saving scheme : पॉलिसी घेतल्यानंतर 3 वर्षांनी पॉलिसी बंद करण्याचा निर्णय गुंतवणूकदार घेऊ शकतो

मुंबई, 27 जानेवारी : पोस्ट ऑफिसद्वारे (Indian Post Office) चालवल्या जाणाऱ्या विविध अल्प बचत योजना (Small Savings Scheme) गुंतवणुकीचा (Investment) सुरक्षित मार्ग म्हणून लोकप्रिय आहेत. उत्तम परतावा आणि सुरक्षितता ही महत्त्वाची वैशिष्ट्यं असलेल्या अल्पबचत योजनांमध्ये (Small Savings Scheme) गुंतवणूक करण्यास मध्यमवर्गीय नागरिक (Middle class People) सर्वाधिक प्राधान्य देतात. त्याचबरोबर आयुर्विम्याबाबत (Life Insurance) जागरूकता (Awareness) निर्माण करण्यासाठी आणि आयुर्विम्याचा प्रसार वाढवण्यासाठीही सरकार पोस्ट खात्यामार्फत विविध योजना राबवत आहे. विशेषत: ग्रामीण भागातही (Rural Area) आयुर्विमा योजनांचा प्रसार करण्यासाठी पोस्ट खात्यातर्फे काही योजना राबवल्या जात आहेत. ग्रामीण भागातल्या लोकांसाठी भारतीय पोस्ट खात्यानं 1995 पासून आयुर्विमा योजनेअंतर्गत (Rural Postal Life Insurance Scheme) ग्राम सुरक्षा (Gram Suraksha) ही अभिनव योजना राबवली आहे. ग्रामीण भागातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या नागरिकांना, विशेषत: महिलांना आर्थिक सुरक्षितता देण्याच्या उद्देशानं आणि आयुर्विम्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ही योजना चालवली जाते. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराने दरमहा साधारण 1500 रुपये गुंतवल्यास मुदतीअंती तब्बल 35 लाख रुपये मिळू शकतात. हे वाचा - येत्या 1 फेब्रुवारीपासून काही नियम बदलणार, तुमच्यावर काय परिणाम होणार? चेक करा किशोरवयातल्या मुलांसाठी (Teenagers) ही उत्तम योजना आहे. 19 वर्षं वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकते. 55 वर्षं वयापर्यंतची व्यक्ती यात गुंतवणूक करू शकते. किमान 10 हजार रुपये, तर कमाल 10 लाख रुपयांच्या विमा रकमेसाठी गुंतवणूक करता येते. मुदतीनंतर किंवा मुदतीच्या आधी खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना बोनससह निश्चित केलेली रक्कम दिली जाते. दरमहा, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक विमा हप्ता भरण्याची सोय यात आहे. हप्ता भरण्यासाठी निश्चित केलेल्या तारखेच्या पुढे 30 दिवासांची अतिरिक्त मुदत असते. त्यामुळे हप्ता भरण्यात सुलभता असते. या योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीने 19 व्या वर्षी 10 लाखांची पॉलिसी घेतली, तर त्याला 55 वर्षांपर्यंत दरमहा 1515 रुपये हप्ता भरावा लागेल. 58 वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठी 1463 रुपये, तर 60 वर्षं वयापर्यंतच्या मुदतीसाठी 1411 रुपये हप्ता भरावा लागेल. 55 व्या वर्षी मुदत संपल्यानंतर 31 लाख 60 हजार रुपये, 58 व्या वर्षी 33 लाख 40 हजार रुपये आणि 60 व्या वर्षी मुदत संपल्यानंतर 34 लाख 60 हजार रुपये गुंतवणूकदाराला मिळतील. हे वाचा - नोकरी सोडा अन् सुरू करा 'हा' व्यवसाय,महिन्याला कमवाल 5 लाख रुपये, जाणून घ्या कसे पॉलिसी घेतल्यानंतर 3 वर्षांनी पॉलिसी बंद करण्याचा निर्णय गुंतवणूकदार घेऊ शकतो; मात्र त्या व्यक्तीला या योजनेतले अन्य लाभ मिळणार नाहीत.
First published:

Tags: Money, Post office, Post office saving

पुढील बातम्या