मुंबई : तुमच्यात जोखीम घेण्याची आणि दीर्घकाळ शेअर बाजारात पैसे गुंतवण्याची क्षमता असेल, तर शेअर बाजार तुम्हाला करोडपती बनवू शकतो. शेअर बाजारातील अनेक स्टॉक्सनं गुंतवणूकदारांना मोठे रिटर्न दिलेत. मार्केटमध्ये असे अनेक मल्टिबॅगर स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मोठी कमाई करुन दिली आहे.
आजही आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत. तो म्हणजे भारत बिजली (Bharat Bijlee) कंपनीचा शेअर. एकेकाळी हा पेनी स्टॉक होता, पण आज त्याची किंमत 2408.55 रुपये आहे.
शुक्रवार (28 ऑक्टोबर 2022) रोजी शेअर बाजार बंद होण्याच्यावेळी भारत बिजली कंपनीचा शेअर हा 4 टक्क्यांहून अधिक म्हणजे सुमारे 98 रुपयांच्या वाढीसह बंद झाला होता. एनएसई (NSE) वर या स्टॉकचा 52 आठवड्यांतील उच्चांक 2,439.95 रुपये आहे. तर 52 आठवड्यांतील नीचांक 1,320.00 रुपये आहे. या कंपनीचं मार्केट कॅप सध्या सुमारे 1,361 कोटी रुपये आहे.
सोन्यात खरेदी करण्याचा विचार करताय? मग 'या' गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या
25 हजारांचे झाले 1 कोटी
भारत बिजली या कंपनीच्या एका शेअरची किंमत 19 ऑक्टोबर 2001 रोजी 5.85 रुपये होती. म्हणजेच तो एक पेनी स्टॉक होता. मात्र आज या शेअरची किंमत 2400 रुपयांच्या पुढे गेली आहे. याचाच अर्थ, या कंपनीच्या शेअर्समध्ये 2001 मध्ये कोणी 25 हजार रुपये गुंतवले असतील, तर आज ती गुंतवणुकीची रक्कम 1 कोटींहून अधिक झाली असती.
गेल्या 5 वर्षांत अशी वाढली शेअरची किंमत
गेल्या एका आठवड्यात हा शेअर 416 रुपयांनी म्हणजेच जवळपास 20 टक्क्यांनी वाढला आहे. तर, मागील एका महिन्याचा विचार केल्यास, या शेअरमध्ये सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील एका महिन्यात या शेअरच्या किमतींमध्ये 554 रुपयांनी वाढ झालीय. एका वर्षात हा शेअर 57 टक्क्यांनी म्हणजेच जवळपास 880 रुपयांनी वाढला आहे. भारत बिजली कंपनीचे शेअर्स गेल्या तीन वर्षांत 1544 रुपयांनी म्हणजेच जवळपास 178 टक्क्यांनी वाढलेत. मागील 5 वर्षांचा विचार केला तर तेव्हा असणाऱ्या किंमतीच्या तुलनेत हा शेअरची किंमत 138 टक्क्यांनी वाढली आहे.
आता UPI वरूनही पेन्शन स्कीममध्ये टाकू शकता पैसे, ‘या’ स्टेप्स करा फॉलो
कंपनी काय करते?
भारत बिजली ही कंपनी ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रिक मोटर्स, लिफ्टसाठी गिअरलेस मशीन यांसारखी उत्पादनं बनवते. ऊर्जा क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी तेजी राहण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, जीडीपी वाढल्यानं देशातील विजेचा वापर वाढेल आणि त्याचा फायदा कंपनीला होईल. यासोबतच ग्रीन एनर्जी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीचाही कंपनीला फायदा होणार आहे.
दरम्यान, भारत बिजली कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त रिटर्न दिला आहे. या कंपनीनं गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Liquor stock, Stock exchanges, Stock Markets